🌟या नियुक्ती सोबतच सचिव पदावर चिखली येथील प्रा.डॉ.अनिल पुरोहित तर कोषाध्यक्ष पदावर विजय तिवारी यांची निवड🌟
चिखली : बुलढाणा जिल्हा पारिक समाजाची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी देऊळगाव राजा येथे रवीवार दि.१३ एप्रिलला समाजाची बैठक संपन्न झाली.बैठकीत पुढील कार्यकाळासाठी अध्यक्ष पदावर व्यास कैन्सर मेमोरियल ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष व सामाजिक कामात निस्वार्थ पणे सेवा देणारे चिखली येथील राजेंद्र व्यास यांची निवड करण्यात आली या नियुक्ती सोबतच सचिव पदावर चिखली येथील प्रा.डॉ.अनिल पुरोहित तसेच कोषाध्यक्ष पदावर विजय तिवारी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
बैठक ही दोन सत्रात पार पडली बैठकीचे पहिले सत्र पारिक समाजाचे जेष्ठ सदस्य व सल्लागार सुरेश पुरोहित यांचे मार्गदर्शनात संपन्न झाले.या वेळी बैठकीची सुरुवात भगवान पाराशर व बालाजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर सुरेश पुरोहित यांचेसह बुलढाणा जिल्हा पारिक समाजाचे माजी अध्यक्ष गोपाल व्यास व सचिव ॶॅड.पवन पारिक उपस्थीत होते.माजी अध्यक्ष गोपाल व्यास यांचे सह पवन पारिक,ॶॅड संदिप पुरोहित खामगांव,अजय पुरोहित, खामगांव, रवी कुमार पुरोहित उदयनगर,राजेश पुरोहित लोणार,निरज पारिक ,प्रतिक पारिक दे.राजा, सागर व्यास दे.राजा ,सुरेश पारिक दे.राजा ,कमलेश बोरा शे.देशमुख, विजय पारिक दे.राजा ,विजय व्यास चिखली, मनोज उपाध्याय पिंपळगांव राजा,दशरथ बोरा शे.देशमुख,अशोक व्यास खामगांव,मुकेश पुरोहित खामगांव,विजय पारिक , राधेश्याम पारिक,कांतीलाल पारिक,दे.राजा ,राजु पारिक दे.मही, ,प्रेमप्रकाश पुरोहित खामगांव,डॉ.राजेश पारीक खामगांव,डॉ.अनिल पुरोहित,विजय तिवारी , राजेंद्र व्यास चिखली तथा डॉ.विनोद बोरा उदयनगर ,मनोज पारिक खामगांव,यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.तसेच पारिक समाजा साठी माजी कार्यकारिणीने केलेल्या कामाचा आढावा घेऊन नवीन कार्यकारिणीची निवड करण्यापुर्वी कराव्या लागणाऱ्या कामावर चर्चा करण्यात आली.तसेच निवडण्यात येणारया नविन कार्यकारिणी च्या नावावर चर्चा करण्यात आली.
सहभोजना नंतरच्या दूसरया सत्रात चर्चेत निवडण्यात आलेल्या तिन नावाची घोषणा सर्वसंमतीने जेष्ठ सदस्य सुरेश पुरोहित यांच्या द्वारे करण्यात आली.यानंतर नवनियुक्त अध्यक्ष राजेन्द्र व्यास, सचिव डॉ.अनिल पुरोहित,व कोषाध्यक्ष विजय तिवारी यांनी जिल्हा पारिक समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही उपस्थित समाजातील सर्व सदस्यांना दिली व लवकरच चिखली येथे पुढील बैठक घेऊन कार्यकारिणीतील उर्वरित पदावर सदस्यांची निवड करण्यात येईल असे सांगुन सर्वांचे आभार मानले. बैठकीत जिल्ह्यातील जवळपास पन्नास चे वर सदस्य हजर होते.
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या