🌟महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसेच ओळख क्रमांक देण्यासाठी ग्रिस्टॅक योजना...!

 


🌟त्यानुसार ग्रिस्टॅकच्या पोर्टलवरून शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार🌟

पुणे :- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसेच ओळख क्रमांक देण्यासाठी ग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत असून या योजनेत आतापर्यंत ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देताना ओळख क्रमांक बंधनकारक केले असून या लाभार्थ्यांच्या संख्येशी तुलना केल्यास राज्यातील ७५ टक्के लाभार्थ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. शेतकऱ्यांकडे असलेली जमीन आधार क्रमांकाशी जोडून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी राज्यात अॅग्रिस्टॅक ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातील तलाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना ओळख क्रमांक देत आहेत. या जोडीला आता सामायिक सुविधा केंद्रांमधूनही शेतकरी ओळख क्रमांक करून घेत आहेत. भूमी अभिलेख विभागाने यापुढील टप्प्यात आता थेट शेतकऱ्यांना स्वतःच नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ग्रिस्टॅकच्या पोर्टलवरून शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या