🌟केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय : सर्व बियाणांची माहिती साथी पोर्टलवर....!

 


🌟साथी पोर्टलची अंमलबजावणी फेज १ व फेज २ अशा दोन टप्प्यात करण्यात येत आहे🌟

मुंबई :- केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने बियाणांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या संनियंत्रणासाठी पोर्टल विकसीत केले आहे. साथी पोर्टलची अंमलबजावणी फेज १ व फेज २ अशा दोन टप्प्यात करण्यात येत आहे. फेज १ - पैदासकार, पायाभूत व प्रमाणित बिजोत्पादन. फेज २ उत्पादित बियाण्याचे वितरण/विक्री. खरीप २०२३ पासून महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेमार्फत फेज-१ टप्प्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये बियाणे उत्पादक कंपन्यांच्या पैदासकार, पायाभूत व प्रमाणित बिजोत्पादन कार्यक्रमाची सर्व प्रक्रिया (उत्पादक कंपन्यांचे शेतनोंदणीपासून उत्पादित बियाण्यास मुक्त साठा प्रमाणपत्र देणेपर्यंतची) साथी पोर्टलमार्फतच केली जाते. कृषी विभागाच्या संनियंत्रणाने खरीप हंगाम २०२४ पासून फेज-२ टप्प्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली असून यामध्ये उत्पादित झालेल्या प्रमाणित बियाण्याचे वितरण/विक्री साथी पोर्टलवर सुरू करण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या