🌟नगर परिषदा,नगरपंचायती,औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मान्यता🌟
मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने काल मंगळवार दि.१५ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून यात राज्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधणारा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे सर्वसामान्य मतदार जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्षाना यापुढे पदच्युत करण्याचा अधिकार नगरसेवकांना देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला नगरसेवक बहुमताने नगराध्यक्षाना हटवू शकतात यावर शिक्कामोर्तब झाले आहे शासनाच्या या निर्णयामुळे नगर पालिकेच्या नगराध्यक्षांना नगरसेवकांना विश्वासात घेवून काम करावे लागणार आहे त्यामुळे यापुढे आता आता नगरसेवकांचेही महत्व वाढले आहे.
काल मंगळवार दि.१५ एप्रिल २०२५ रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत गृह विभाग,महसूल विभाग,नगरविकास विभाग तसेच विधी व न्याय विभागाच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागातील सर्वाधिक ३ निर्णय घेण्यात आले आहेत या तीन निर्णयात नगर परिषदा,नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा. नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करून कर वसूलीसाठी व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तर, लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
💫महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा :-
नगर पालिका,नगर पंचायतीमध्येही अभय योजना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा नगर परिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ
0 टिप्पण्या