🌟या गौरवाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालय परभणी येथे एक विशेष कार्यक्रम संपन्न ; मान्यवरांच्या हस्ते सत्कार🌟
परभणी (दि.16 एप्रिल 2025) - प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-2.0 अंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (NRM) कामात उल्लेखनीय प्रगती करीत परभणी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे यश संपादन केले या गौरवाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालय, परभणी येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे येथील पाणलोट विकास नियंत्रक दिलीप प्रक्षाळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी तथा सदर यंत्रणेचे अध्यक्ष रघुनाथ गावडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा यंत्रणेचे सह अध्यक्ष नतिशा माथुर आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. क.ज. कुच्चे यांचा स्मृतीचिन्ह, टि-शर्ट व टोपी देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी एस.डी. मोडवान, जलसंधारण अधिकारी हैदर पठाण, एनजीओ विकास लटपटे (सचिव, श्री. निळकंठेश्वर बहुउद्देशीय संस्था), जिल्हा प्रकल्प समन्वयक शेख जानिमीया, लेखा लिपिक संजय पांडे, संगणक प्रशासक प्रशांत कदम तसेच डब्ल्यूडीटी सदस्य सतिश कटारे, मुकुंद शिंदे, सिध्दार्थ वाव्हळे, लक्ष्मण दुधाटे, सुभाष राणे, किशोर खनपटे आणि नितीन सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात परभणी जिल्ह्याच्या जलसंधारण क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचे कौतुक करण्यात आले आणि आगामी काळात अधिक प्रगती साधण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला......
0 टिप्पण्या