🌟बीडचे भूमिपुत्र भरत गिते यांची ‘प्रासंगिक’ कार्यक्रमात बुधवारी सकाळी ११ वाजता बीड आकाशवाणी केंद्रावर मुलाखत.....!


🌟उद्योजक भरत गिते यांनी एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सामंजस्य करार केला🌟

बीड (प्रतिनिधी) :- उद्योग क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबविणारे ॲल्युमिनियम मॅन बीड -परळीचे भूमिपुत्र उद्योजक भरत गित्ते यांची  ‘प्रासंगिक’ कार्यक्रमात बुधवारी दि. २३ एप्रिल रोजी बीड आकाशवाणी केंद्रावर मुलाखत ऐकण्यासाठी प्रसारण होणार आहे. तरी सर्वानी जरूर ऐकावी असे आवाहन कारण्यात आले आहे. 

         स्वतःच्या कामाप्रती निष्ठावंत राहून प्रामाणिकपणाने ध्येय उराशी बाळगून यशाला गवसणी घालणे शक्य आहे. मात्र त्यासाठी निराशा झटकली पाहिजे आपला दृष्टिकोन न्याय निवाडा करण्यापेक्षा सकारात्मक गोष्ट निवडण्यासाठीचा असावा. यातूनच कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते. सर्वांसाठी प्रेरक होईल अशा पैलूंना उलगडून दिला आहे. 

परळीचा भूमीपुत्र असलेले उद्योजक भरत गिते यांनी एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सामंजस्य करार केला. आशा अनेक उपयुक्त बाबी,  विविध आणि चौफेर मुद्द्यांवर या मुलाखतीच्या माध्यमातून  प्रासंगिक या कार्यक्रमात  बीड-परळीचे भूमीपुत्र, 

भारताच्या परदेशी गुंतवणूकीचे सल्लागार, ज्यांना 'मॅन ऑफ अल्युमिनियम' म्हणून ओळखलं जातं असे भरत गिते यांची डॉ. संपदा कुलकर्णी यांनी  मुलाखत घेतली आहे. 

मुलाखत प्रसारण - बुधवार, दि. २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता 

आकाशवाणी (१०२.९ MHz)बीड केंद्रावर होणार आहे. यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, #Newsonair हे मोबाईल ऍप्लिकेशन.

• Android App - https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews

• IoS App - https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867

• Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.php?channel=164  यावर ऐकण्या साठी प्रसारित होणार आहे. तरी सर्वांनी ही मुलाखत जरूर ऐकावी असे आवाहन करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या