🌟कक्कया ढोर समाजातील मान्यवरांनी केले डॉ.प्रिया फुलवरे यांच्यासह फुलवरे कुटुंबाचे अभिनंदन🌟
परभणी :- परभणी शहरातील स्वर्गीय मारुतराव नांदुरे यांची नात व श्री.प्रभु पांडुरंग फुलवरे रिसनगावकर हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर (औ.बाद) यांची सुकन्या डॉ.कु.प्रिया प्रभु फुलवले यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस परीक्षा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन नांदेड जिल्ह्यातील कक्कया ढोर समाजातील प्रथम महिला डॉक्टर होण्याचा सर्वोच्च बहुमान प्राप्त केला.
क्षेत्रातील एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ.प्रिया प्रभु फुलवले व त्यांचे आई-वडील सौ.सुरेखा प्रभू फुलवरे व प्रभु पांडुरंग फुलवरे यांचे कक्कया ढोर समाजातील समाजसेवक तथा धाडसी नेतृत्व प्रतिष्ठीत व्यापारी राजू विश्वनाथ नारायणकर,हिंगोली जिल्ह्यातील प्रतिष्ठीत व्यापारी/उद्योजक किरणकुमार उर्फ पिंटू हिवरे, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील माजी नगरसेवक नामदेवराव फुलपगार, पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील प्रतिष्ठित व्यापारी आकाश फुलवरे,परभणी येथील प्रतिष्ठित किरण फुलपगार, पुर्णा येथील प्रतिष्ठित व्यापारी अनील नारायनकर,रोहित नारायणकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन करुन डॉ.प्रिया फुलवरे यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.......
0 टिप्पण्या