🌟सर्वोच्च न्यायालयाने यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याला पासपोर्ट देण्यास दिला नकार.....!


🌟यानंतर न्यायालयाने अलाहाबादिया याला दोन आठवड्यांनी येण्यास सांगितले🌟

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याला काल मंगळवार दि.०१ एप्रिल २०२५ रोजी जोरदार झटका देत त्याला पासपोर्ट देण्यास नकार दिला आहे. 'जर पासपोर्ट जारी करण्याचा आदेश दिला तर त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे रणवीर अलाहाबादिया याच्या रोजीरोटीवर होणाऱ्या परिणामाचा हवाला देत पासपोर्ट सादर करण्याच्या अटीत सुधारणा करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. 

यावर न्यायालयाने म्हटले की, जर आम्ही तुम्हाला प्रवास करण्याची परवानगी दिली, तर चौकशीवर परिणाम होईल आणि ती पुढे ढकलली जाऊ शकते. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणात सांगितले की, तपास पूर्ण करण्यासाठी आणखी २ आठवडे लागतील. यानंतर न्यायालयाने अलाहाबादिया याला दोन आठवड्यांनी येण्यास सांगितले आहे.......

💫आणखी एकाला पासपोर्ट नाकारला :-

न्यायालयाने आणखी एक यूट्यूबर आशिष चंचलानी यालाही पासपोर्ट देण्यास नकार दिला. या सर्वांवर 'इंडियाज गॉट लेटेंट' या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये अश्लील टिप्पण्या केल्याचा आरोप आहे. शो दरम्यान, काही लोकांनी पालकांबाबत अश्लील टिप्पण्या केल्या होत्या. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या