🌟स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने घातक शस्त्रांसह दोन आरोपींना घेतले ताब्यात🌟
परभणी :- परभणी जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका पथकाने अत्यंत धाडसी कारवाई करीत सराईत गुन्हेगाराससह घातक शस्त्रसाठा ज्यात गावठी पिस्टलसह तलवारी व इतर घातक शस्त्रांसह दोन आरोपींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्याची कारवाई केली.
परभणी जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकास खबऱ्यामार्फत काल मंगळवार दि.२९ एप्रिल २०२५ रोजी माहिती प्राप्त झाल्या पाठोपाठ पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व त्यांच्या पथकाने मौजे नांदखेडा या गावी धाव घेतली व तेथील सराईत गुन्हेगार शेर खान पठाण यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या सोबत हनमंत रमेश सोनटक्के (वाणी पिंपळगाव तालुका पालम) हा देखील मिळून आला पथकाने त्यांच्या ताब्यातील स्कॉरपिओ कार क्रमांक एम.एच.२३ ए.आर.२९३९ तपासणी केली त्यात घातक अग्नीशस्त्र (गावठी पिस्तुल) व तलवार मिळून आले. त्यांच्या घराची झडती घेतली. त्यात एक अवैध अग्नीशस्त्र(गावठी पिस्तूल) 4 जिवंत काडतूस, तीन तलवारी, एक खंजर,एक गुप्ती, एक कत्ती,एक रॉड, असे साहित्य मिळून आले पोलिसांनी ते सर्व घातक शस्त्र व वाहन जप्त केले तर दोघांना ताब्यात घेतले. शेर खान उर्फ समंदर खान पठाण याच्या विरोधात चुडावा,नवा मोंढा,पूर्णा,परभणी ग्रामीण वगैरे पोलिस स्थानकात यापूर्वी मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल झालेले आहेत तर सोनटक्के याच्या विरोधातही चुडावा ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या या पथकात निरीक्षक पाटील,सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू मुत्तेपोड, पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, अंमलदार मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, सुग्रीव केंद्रे, निलेश भूजबळ, जमीरोद्दीन फारुखी, रवीकुमार जाधव, सूर्यकांत फड, जयश्री आव्हाड, शेख रफियोद्दीन, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गडदे व अंमलदार कादरी, सायबर पोलिस स्टेशनचे गणेश कौटकर हे सहभागी होते. पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार या पथकाने ही कारवाई केली.......
0 टिप्पण्या