🌟पुर्णा तालुक्यातील आहेरवाडीत आजपासून यात्रा महोत्सवास सुरुवात....!


🌟याञा महोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे उद्या बुधवारी हरिकीर्तन🌟


पुर्णा :-
पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे श्री सजगीर श्री हिरागीर गुरुवर्य रामगीर महाराज यांच्या याञा महोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन व पहिली किर्तन सेवा हभप.किर्तन केशरी अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे उद्या बुधवार दि.०२ एप्रिल २०२५ रोजी राञी ०८.०० ते १०.०० या वेळेत किर्तन होणार आहे.

अखंड हरिनाम सप्ताहात दररोज दुपारी ०१.०० ते ०५.०० या वेळेत भागवताचार्य रूपालीताई सवणे परतुरकर यांची दररोज भागवत कथा होईल सोपान महाराज आहेरवाडीकर, माउली महाराज आळंदीकर, शिवाजी महाराज देशमुख, माउली महाराज जाहुरकर,राम महाराज खैरे धोञेकर, सुरदास महाराज रायवाडीकर रामकृष्ण महाराज ठाकुर पंढरपूर, गुरुवार दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी सर्व भाविकासाठी भाजी भाकरी चा महाप्रसाद होईल तरी भाविकांनी या किर्तन श्रवनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावकरी मंडळी आहेरवाडी यांनी केले आहे.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या