🌟त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟
परभणी :- पुणे येथील आर्ट बिटस पुणे अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ०८ मार्च जागतिक महीला दिना निमित्य घेण्यात आलेल्या ऑनलाईन व आफलाईन पेटिंग प्रदर्शन दर्पण आर्ट गॅलरी अंतर्गत दि.०७ ते ०९ मार्च २०२५ रोजी सतत तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत परभणी येथील आदर्श कलाशिक्षीका तृप्तजा कुलभुषण महाजन यांना घवघवीत यश मिळाले आहे या स्पर्धेत कलाशिक्षीका तृप्तजा कुलभुषण महाजन यांचे दोन पेंटिंग निवडण्यात आले असून यात रियाज आफ लाईफ व राधा या चित्रांचा समावेश आहे.आर्ट बिटस पुणे अंतर्गत आयोजित आयोजित स्पर्धेत संपुर्ण भारतासह महाष्ट्रातुन देखील नांमवत चित्रकारांनी सहभाग नोंदवला होता तृप्तजा महाजन यांचे तीन चित्र श्रीकृष्ण म्युझीक वूमन सर्व चित्र अल्हादायक रंगसंगतीत पध्दतिने सपाट रंग लेपन आहे तसेच आर्ट बिटस प्रमुख संतोष पांचाळ सर यांनी विशेष प्रवेशिका म्हणुन स्पेशल नोंद केली तृप्तजा महाजन या सध्या जोर्तिगमय ईंग्लीश स्कुल परभणी मध्ये आर्दश कलाशिक्षिका म्हणुन कार्यरत आहेत त्यांना हा कलेचा वारसा त्यांच्या आई कडुन मिळाला आहे परभणी,नांदेड मध्ये त्यांचा चाहता वर्ग निर्माण केला आहे त्यांना त्यांचे पती कुलभुषण महाजण यांची नेहमीच मोलाची साथ असते मागील वर्षी उत्तर प्रदेशातील झांसीत झालेल्या चित्र प्रदर्शनात त्यांना सिल्वर मेडल प्राप्त झाले होते जोर्तिगमय स्कुलच्या प्रमुख प्रिया दिलीप ठाकुर यांनी कलाशिक्षका महाजन यांचे विशेष कौतुक केले पुढिल काळात महिला जिवनावर चित्र रेखाटन चालु आहे व मुंबई व पुणे येथे सोलो शो करण्याचा त्यांचा मानस आहे त्यांना मिळालेल्या या यशामुळे परभणी जिल्ह्यातील कलाक्षेत्रात मानाचा तुरा मिळाला आहे.......
0 टिप्पण्या