🌟भारत-श्रीलंका संरक्षण करार : संरक्षण क्षेत्रासह अन्य सात करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या....!


🌟भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा नागरी पुरस्कार प्रदान🌟


कोलंबो :-
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर असून शनिवार दि.०५ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराकुमार दिसानायके यांच्याशी विविध विषयांवर सर्वसमावेशक चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये संरक्षण क्षेत्रासह अन्य सात करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आपल्या सुरक्षाविषयक हितांमध्ये साम्य असून दोन्ही देशांची सुरक्षितता एकमेकांशी जोडलेली आणि एकमेकांवर अवलंबून आहे, असे यावेळी मोदी म्हणाले. शनिवारी दिसानायके आणि मोदी यांच्यात प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये सात करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. भारत आणि श्रीलंका यांच्यात संरक्षण भागीदारी करार झाला. दोन्ही नेत्यांनी करारावर स्वाक्षरी केली. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव - विक्रम मिस्त्री आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

💫ऊर्जा केंद्र

दोन्ही देशांमध्ये त्रिंकोमालीला ऊर्जा केंद्र म्हणून - विकसित करण्यासाठी एक करारही झाला. दरम्यान, मोदी आणि दिसानायके यांनी समपूर सौरऊर्जा प्रकल्पाचे - उद्घाटन केले. भारत आणि श्रीलंकेने श्रीलंकेला बहुक्षेत्रीय अनुदान सहाय्य देण्यावरही सहमती दर्शविली आहे. - दुसरीकडे, भारत, संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका यांनीही मोदी आणि दिसानायके यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

💫 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र विभूषणाय पुरस्कार :-

दरम्यान, अनुरा कुमारा दिसानायके यांनी मोदींना - श्रीलंका मित्र विभूषणाय हा सर्वोच्च गैर-नागरी सन्मान प्रदान केला. या सन्मानानंतर यांनी, हा १४० कोटी भारतीयांसाठी सन्मान असल्याचे म्हटले आहे. मोदींनी श्रीलंकेचे राष्ट्रपती, सरकार आणि जनतेचे आभार मानले आहेत. मित्र विभूषणय हा श्रीलंकेतील सर्वोच्च बिगर-नागरी सन्मान आहे. हा सन्मान परदेशी मान्यवरांना दिला जातो. श्रीलंकेशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या राष्ट्रप्रमुखांना श्रीलंका सरकार हे पुरस्कार देते.

रौप्यपदक आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पदक श्रीलंकेच्या नऊ रत्नांनी सजवले आहे. यात चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि कमळाच्या पाकळ्या बनवलेल्या आहेत. पदकावर "पुन कलसा" कोरलेले आहे. ते भाताने भरलेले भांडे असते. हे समृद्धी आणि नूतनीकरणाचे प्रतीक मानले जाते. पदकावरील सूर्य आणि चंद्र हे भारत आणि श्रीलंकेतील शाश्वत संबंधांचे - प्रतिनिधित्व करतात. हा पुरस्कार २००८ मध्ये श्रीलंकेचे -तत्कालीन राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी सुरू केला होता.

💫भारताच्या सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी श्रीलंका वचनबद्ध - अनुराकुमार दिसानायके

दिसानायके यांनी भारताच्या सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी श्रीलंकेच्या वचनबद्धतेचा पुन्हा एकदा उच्चार केला. श्रीलंका आपल्या भूमीचा वापर भारताच्या सुरक्षेविरुद्ध किंवा प्रादेशिक स्थिरतेच्या विरुद्ध असलेल्या कोणत्याही कारणासाठी करू देणार नाही. मोदींशी औपचारिक चर्चेनंतर कोलंबोमध्ये हे विधान देण्यात आले. हे भारत आणि श्रीलंकेमधील खोल विश्वास आणि सहकार्याचे प्रतिबिंब आहे.

दिसानायके यांनी एका महत्त्वाच्या सागरी मुद्द्यावर मोदींकडून सहकार्य मागितले. त्यांनी मोदींना श्रीलंकेच्या दाव्यावर संयुक्त राष्ट्र महासागर आयोगासोबत तांत्रिक चर्चा जलद करण्याची विनंती केली. हा मुद्दा श्रीलंकेच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या पलीकडे असलेल्या सागरी सीमांशी संबंधित आहे.

💫श्रीलंकेच्या डिजिटल ओळख प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपयांची आर्थिक मदत : अनुराकुमार दिसानायके यांनी मानले आभार 

दिसानायके यांनी डिजिटल अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात सहकार्याच्या शक्यतेवरही चर्चा केली. ते म्हणाले की, - श्रीलंकेला वाढ, नवोन्मेष आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी डिजिटल अर्थव्यवस्थेचे महत्त्व कळले आहे. श्रीलंकेच्या डिजिटल ओळख प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपयांची आर्थिक मदत दिल्याबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या