🌟परभणी तालुक्यातील पेडगाव शिवारात आत्महत्या केलेल्या शिक्षकाचा मृतदेह ताब्यात घ्यावयास नातेवाईकांचा नकार....!


🌟आरोपींना अटक करा व कुटूंबियांना न्याय द्या अशी मागणी🌟

परभणी (दि.१८ एप्रिल २०२५) : परभणी तालुक्यातील पेडगाव शिवारात गुरुवार दि.१७ एप्रिल २०२५ रोजी गळफास लावून आत्महत्या केलेल्या मयत शिक्षक सोपान पालवे यांच्या परिवारातील सदस्यास अनुकंपा तत्वावर नोकरी द्यावी, संस्थेने उकळलेले पैसे व्याजासह परत करावेत तसेच संस्थाध्यक्ष आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत संतप्त नातेवाईकांनी मयत सोपान पालवे यांचा मृतदेह ताब्यात घ्यावयास नकार दिला.

          गुरुवारी पहाटे पेडगाव शिवारात सोपान पालवे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातून संस्थेचे सचिव यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. तसेच आपल्या आत्महत्येस तेच जबाबदार आहेत, असे नमूद केले. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात मयताच्या पत्नी सागर पालवे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे संस्थेचे सचिव यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला व त्यांना ताब्यातही घेतले. परंतु, नातेवाईकांनी या प्रकरणात अन्य मागण्या करीत जिल्हा शासकीय रुग्णालयातून तो मृतदेह ताब्यात घेतला नाही. शुक्रवारी सायंकाळपर्यंत नातेवाईक या प्रकरणात न्याय द्यावा, अशी मागणी करीत होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या