🌟परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कर्मचार्‍यांना पदोन्नती......!


🌟विद्यापीठात मंजूर पदापैकी जवळपास 60 टक्के पदे रिक्त🌟 

परभणी (दि.१० एप्रिल २०२५) : परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि यांच्या  नेतृत्वाखाली आणि कुलसचिव संतोष वेणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठात कार्यरत असलेल्या अनेक कर्मचार्‍यांना नुकतीच पदोन्नती देण्यात आली आहे.

              विद्यापीठात मंजूर पदापैकी जवळपास 60 टक्के पदे रिक्त आहेत, ज्यामुळे शिक्षण, संशोधन, आणि विस्तार कार्यांवर परिणाम होत आहे. तसेच  कर्मचार्‍यांवर कामाचा ताण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पदोन्नती प्रक्रियेद्वारे रिक्त पदे भरून कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाद्वारे केला जात आहे. पदोन्नती मिळालेल्या कर्मचार्‍यांमध्ये प्रशासन, शिक्षण, संशोधन व विस्तार विभागातील विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. दीर्घ काळापासून प्रामाणिकपणे कार्य करणार्‍या आणि शैक्षणिक पात्रता, सेवाज्येष्ठता असलेल्या तसेच  त्यांच्या योगदानाची दखल घेत कर्मचार्‍यांची वरिष्ठ पदांवर ही पदोन्नती करण्यात आली आहे.

           पदोन्नती झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक ते सहयोगी प्राध्यापक 18, कनिष्ठ संशोधन सहाय्यक ते सहाय्यक प्राध्यापक - 14, सहाय्यक कक्ष अधिकारी ते कक्ष अधिकारी - 3, वरिष्ठ लिपिक ते सहाय्यक कक्ष अधिकारी - 7, वर्ग चार मधून कृषि सहाय्यक - 4, कनिष्ठ लिपिक ते वरिष्ठ लिपिक - 20, मजूर किंवा वर्ग चार मधून कनिष्ठ लिपिक - 22 असे एकूण 88 अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

          पदोन्नतीची संपूर्ण प्रक्रिया कुलसचिव संतोष वेणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप कुलसचिव  पुरभा काळे, सहाय्यक कुलसचिव  राम खोबे, कक्ष अधिकारी गंगाधर चांदणे, नरेंद्र खरतडे आणि कुलसचिव कार्यालयातील इतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेवून यशस्वी पार पाडली. या पदोन्नतीमुळे कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आणि नवचैतन्य निर्माण झाले. त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार व्यक्त करीत पुढील काळात अधिक जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

           दरम्यान, कुलगुरू इन्द्र मणि यांनी पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचार्‍यांचे अभिनंदन करत, ही पदोन्नती म्हणजे कर्मचार्‍यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित असून, भविष्यातही ते विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देत राहतील, असे मत व्यक्त केले. या निर्णयामुळे कर्मचार्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, कार्यक्षमता व उत्साहात वाढ होईल, असा विश् वास कुलसचिव  संतोष वेणीकर यांनी व्यक्त केला. ही पदोन्नती केवळ वैयक्तिक प्रगती नाही, तर विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण कार्यपद्धतीचेही प्रतीक आहे. येणार्‍या काळातही कर्मचार्‍यांना अश्याच संधी मिळातील, असे त्यांनी नमूद केले............

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या