🌟महाराष्ट्र सरकार राज्यातील सर्व रक्तपेढ्यांची तपासणी करणार......!


🌟जिल्हा रक्त संक्रमण अधिकाऱ्यांना महिनाभरात रक्तपेढ्यांची तपासणी करण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले🌟

मुंबई :- महाराष्ट्र सरकार राज्यातील सर्व रक्तपेढ्या अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक रक्तपेढीतील उपलब्ध मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री, कार्यपद्धती, रक्तासाठी आकारण्यात येणारे शुल्क याची तपासणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा रक्त संक्रमण अधिकाऱ्यांना महिनाभरात सर्व रक्तपेढ्यांची तपासणी करण्याचे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत.

राज्यातील रक्तपेढ्यांचे बळकटीकरण करण्यासंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये शासकीय, निमशासकीय, खाजगी, सार्वजनिक विश्वस्त संस्था, इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित, महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या रक्तपेढ्या अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या रक्तपेढ्यांची तपासणी करण्याचा करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल पुढील महिनाभरामध्ये सादर करावा, असे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना दिले आहेत.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या