🌟देऊळगाव दुधाटे येथील शेतकरी रामेश्वर नागोराव दुधाटे यांनी विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतीवर घेतलेल्या कर्जाला कंटाळून उंदीर मारण्याचे वीस प्राशन केले असता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना घडली या प्रकरणी गंगाखेड पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची खबर मयत शेतकरी यांचा मुलगा बद्रीनाथ दुधाटे यांनी दिली आहे.
त्यांचे वडील रामेश्वर नागोराव दुधाटे वय ५५ वर्षे बँकेच्या कर्जाला कंटाळून १६ एप्रिल रोजी त्यांनी विषारी औषध प्राशन केले व त्यांचा त्यांना उपचारासाठी साठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात त्यांना दवाखान्यात नेले होते मात्र त्यांची प्रकृती जास्त बिघडयाने १८ रोजी शासकीय रुग्णालय परभणी येथील डॉक्टरने तपासले असता रामेश्वर दुधाटे यांना मयत घोषित केले. यानंतर गंगाखेड पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि इगळे करीत आहेत त्यांच्या पश्चात ०२ मुले ०१ मुलगी ०२ भाऊ असा मोठा परिवार आहे.......
0 टिप्पण्या