🌟गौर येथील देवस्थानाच्या जमिनीवरील ४५ हजार ब्रास उत्खननानंतर खुजडा खदानीतून २५५७ ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन🌟
🌟महसूल प्रशासनातील भ्रष्टाचारीच करताय शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या शासकीय महसुलाचे हणण🌟
पुर्णा (विशेष वृत्त):- पुर्णा तालुक्यातील महसूल प्रशासनातील अधिकारी व तहसिलदार माधवराव बोथिकर यांच्या अनागोंदी कारभारामुळे संपूर्ण तालुक्यात अवैध गौण खनिज माफियाशाही डोकं वर काढतांना दिसत असून संबंधित अधिकारी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून शासकीय महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीने कर्तव्य बजावण्याऐवजी शासकीय गौण खनिज मुरूम माती दगडखडी वाळू आदींचे बेकायदेशीररित्या प्रचंड प्रमाणात नियमबाह्य उत्खनन करणाऱ्या बेईमान गुत्तेदार व गौण खनिज माफियांचे हितसंबंध मोठ्या प्रमाणात जोपासत असल्याचे निदर्शनास येत आहे पुर्णा तालुक्यातील आडगाव लासिना शिवारातील पुर्णा-पांगरा ढोणे रोडवरील उड्डाणपूल गुत्तेदार कंपनी गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मिक्सर प्लॉन्टवरील बाराशे ते पंधराशे ब्रास वाळू साठ्याऐवजी तडजोडीअंती केवळ चारशे पन्नास ब्रास वाळू साठा दाखवून संबंधित गुत्तेदार कंपनीला केवळ ०३ लाख ४६ हजार ५०० रुपये इतका थातुरमातुर संशयास्पद दंड आकारल्याचे उघड झाल्यानंतर पुन्हा गौर शिवारातील गट क्रमांक ४०२ या महादलिंग स्वामी देवस्थानाच्या वहितीतील दहा एकर जमिनीवर समृध्दी महामार्ग रस्ता बांधकामांचे टेंडर घेतलेल्या मोंटेकार्लो लिमिटेड कंट्रक्शनचे पुर्णाचे मुख्य प्रोजेक्ट मॅनेजर यांनी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार ब्रास मुरुम दगड खडीचे बेकायदेशीर नियमबाह्य उत्खनन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला या दोन्ही प्रकरणांत तहसिलदार माधवराव बोथिकर व नायब तहसिलदार तथा महसूल प्रशासनाचे अधिकारी प्रशांत थारकर यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्खननाचे मोजमाप भुमि अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून ईटीएस मोजणी करण्याऐवजी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून थातूरमातूर पंचणामानाट्य रंगवून लाखों ब्रास उत्खननाचे रुपांतर केवळ चाळीस पंचेचाळीस ब्रास मध्ये करुन शासकीय महसूलाशी दगलबाजी केल्याचा गंभीर प्रकार समोर सदरील घटना ताज्याच असतांना पुन्हा पुर्णा तालुक्यातील खुजडा शिवारातील गट क्रमांक १५३ मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुर्णा तहसील कार्यालयाने फक्त २०० ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी दिली असताना संबंधित गुत्तेदाराने तब्बल २५५७.२२ ब्रास खडक मुरूम लंपास केल्याचे ड्रोन कॅमेऱ्याच्या मोजणी अहवालातून स्पष्ट झाले आहे ही गंभीर बाब समोर आल्यानंतर तहसिलदार माधवराव बोथिकर व महसूल प्रशासनातील अधिकारी तथा नायब तहसिलदार प्रशांत थारकर तसेच संबंधित तलाठी,मंडळ अधिकारी यांच्या संशयास्पद भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे महसूल खात्याच्या नियम धाब्यावर बसवून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे खुजडा खदानीतील मुरुम घरकूल लाभार्थ्यांऐवजी रेल्वे ब्रिज बांधकामासाठी विक्री केल्याचा आरोप होत आहे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
🌟रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांनी गैरव्यवहाराच्या चौकशीची केली मागणी :-
राजकुमार सूर्यवंशी यांनी दोन दिवस आमरण उपोषण केले होते. मात्र, महसूल अधिकाऱ्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा आहे. तहसील कार्यालयातील अधिकारी संयुक्त संगनमताने शासनाचा महसूल बुडवून स्वतःचा फायदा करून घेत असल्याचा आरोप होत आहे.....
0 टिप्पण्या