🌟कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू हे करणार मार्गदर्शन🌟
१. दिव्यांगांना सहा हजार रूपये प्रति महिना देण्यात यावा
२. दिव्यांग निराधार विधवा व परितक्त्या भगीनी यांना घरकुलात प्राधान्य - देण्यात यावे.
३. भूमीहीन बेघर दिव्यांगाना एक गुंठा जागा घरकुला साठी देण्यात यावी.
४. घरकुलासाठी ५ लाख रू. निधी व शहर, ग्रामिण भागात समान निधी देण्यात यावा.
५. दिव्यांगाची १० लाखाची आरोग्य विमा - पॉलिसी सरकारने काढावी.
६. दिव्यांगाना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत ने जागा उपलब्ध करून द्यावे.
७. घरकुलासाठी मोफत रेती शासनाच्या आदेशाचे अंमलबजावणी करण्यात यावी.
८. पेरणी ते कापणी पर्यंत चे सर्व कामे (रोजगार हमी योजना) मार्फत कामे करण्यात यावे.
९. शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करण्यात यावी व सातबारा कोरा करण्यात यावा.
१०. रोजगार सेवक व ग्रा.पं. रोजगारसेवक यांना सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावे.
११. शेतीमाल हमी भावानेच खरेदी करण्यात यावा व हमी भावाने शेतीमाल खरेदी नाकरणाऱ्या व्यापाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी.
या मेळाव्याला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंगभाऊ बोधने, शिवहार सोनटक्के तालुकाप्रमुख पूर्णा, विष्णू भाऊ बोकारे, संजय वाघमारे, सचिन सोनकांबळे श्रीहरी इंगोले, विठ्ठल जोगदंड, बळीराम गुंडाळे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे......
0 टिप्पण्या