🌟परभणी शहरात भगवान महावीर यांचा २६२४ वा जन्मोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा....!


(भगवान महावीर जयंती निमित्त आज सकल जैन समाजाच्या वतीने भजन गल्ली जैन मंदिर येथे आयोजित रक्तदान शिबिरात 42 रक्तदात्यांनी केले रक्तदान)

🌟शहरात आज भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवा निमित भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती🌟 

परभणी :- परभणी येथे आज गुरुवार दि.१० एप्रिल २०२५ रोजी भगवान महावीर यांच्या २६२४ व्या जन्म कल्याणक दिनानिमित्त सकल जैन समाजा तर्फे आज परभणी शहरामध्ये सर्व जैन मंदिर मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. सकाळी सात वाजता आनंद नगर जैन मंदिर इथून शोभा यात्रेला सुरुवात झाली तेथून सुभाष रोड जैन मंदिर भजन गल्ली जैन मंदिर पोलीस कॉर्टर नानलपेठ मार्गे गांधी पार्क नारायण चाळ मार्गे गांधी पार्कमध्ये शोभायात्रेचा स्तंभ पूजन करून समारोप झाला.

 यावेळी सकल जैन समाजातील हजारो पुरुष महिला उपस्थित होते याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रम झाले लहान मुलांच्या नाटिका डान्स वक्तृत्व झाले यावेळी जैन समाजातील माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही समाजाला प्रबोधन केले व जैन स्तंभाला अभिवादन केले व जैन मंदिर भजन गल्ली येथे भेट दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पण जैन स्तंभास अभिवादन केले यावेळी शहरातील सर्व जैन मंदिर चे अध्यक्ष सचिव सर्व ट्रस्टी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर सर्व जैन मंदिरात अभिषेक पूजन जन्मोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला भजन गल्ली जैन मंदिर येथे रक्तदान शिबिरात 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले . आचार्य आर्यनंदी महाराज निबंद स्पर्धा चे आयोजन वय बक्षीस वितरण कार्यक्रम यावेळी घेण्यात आला बक्षीस वितरण श्री प्रसन्ना यांच्याकडून देण्यात आले

नंदकुमार घोडके सुदेश अंबुरे विजयकुमार संघई अजित मोगले ,धरमचंद गंगवाल पवन झांजरी, विजय शेठ काला विजय कुचेरिया, महेश दुगड, सुभाष कोटेच्या, गेनमलजी बाटिया ,झेड आर मुथा, सुभाष जी गंगवाल. प्रास्ताविक  डॉ. कीर्तींजय गोरे यांनी केले गांधी पार्क येथील जैन अहिंसा स्तंभाचे  नियोजन रितेश जैन, श्रीकांत अंबुरे, विनोद गोंगे ,यांनी केले यावेळी सर्व सकल जैन समाज उपस्थित होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या