🌟जेष्ठ पत्रकार साहित्यिक तथा समाज सेवी स.रविंद्रसिंघ मोदी यांची मागणी🌟
निवेदनात पुढे म्हंटल आहे की, शीख धर्माचे दहावे गुरु, श्री गुरु गोबिंद सिंघजी महाराज यांनी सुमारे 317 वर्षापूर्वी सन 1708 मध्ये हजुरसाहिब नांदेड येथे श्री गुरु ग्रन्थसाहेबांना गुरुगद्दी प्रदान केली होती. गुरुजींचा शेवटचा स्थान म्हणून हजुरसाहेबची ओळख कायम आहे. त्यामुळे येथे शीख धर्म, शीख इतिहास, शीख जीवनशैली, शीख संस्कृती आणी शीख सामाजिक साहित्याचे अभ्यास होणे अभिप्रेत आहे. जर येथे बोर्डाच्या वतीने स्टडी सर्कल सुरु केला गेला तर त्याचा लाभ इतिहास आणी साहित्य क्षेत्रात शोध लिखाण करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच होईल. गुरुद्वारा सचखंड बोर्ड संस्था स्थापन होऊन दीर्घ काळ झाला असून संस्थेचेही इतिहास उपलब्ध नसणे एक अतिश्योक्ति होय असे स. रविंद्रसिंघ मोदी यांचे म्हणणे आहे. गुरुद्वारा बोर्ड अंतर्गत श्री हजुरसाहिब स्टडी सर्कल सुरु करावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधीक्षक स. गुरबचनसिंघ यांना ही देण्यात आली आहे.
📚धर्म आणी समाजाचे,बहुभाषी साहित्य सृजन व्हावे :-
दक्षिण भरतात विशेषतः महाराष्ट्र, तेलंगाना आणी कर्नाटक मध्ये शीख समाज मोठ्या संख्येत वास्तवयास आहे. मराठावाड़ा आणी तेलंगानातील शीख समुदायला हजुरी समाज किंवा दखनी समाज म्हणून सम्बोधल्या जातो. गेली तीन शतकं हा समाज येथे वावरत आहे. याठिकाणी धर्माचा वारसा विद्यमान आहे. पण येथील सामाजाकडे स्वतः ची भाषा, स्वतःचे साहित्य नाही. अफाट संघर्षाचा इतिहास आहे पण ते जगापुढे आलेला नाही. यासाठी समाजाने योगदान द्यावे. विद्यार्थ्यांनी शोध कार्य व लिखाण करावे. शीख धर्म आणी समाजाचे इतिहास व साहित्य बहुभाषी असावे. मराठी, तेलगु, कन्नड, गुजराती, सिंधी सारख्या भाषा मध्ये साहित्य निर्मिती किंवा अनुवाद व्हावे असे मनोगत निवेदन सादर करतांना चर्चेत स.रविंद्रसिंघ मोदी यांनी मांडले.........
0 टिप्पण्या