🌟पतंजलीचे प्रांत सदस्य कुंडलिकराव निर्मले यांचे प्रतिपादन🌟
कळमनुरी - विविध दुर्धर आजारांपासून शरीराला दूर ठेवण्यासाठी योगासने व प्राणायाम महत्त्वाचे असल्याचे आज सिद्ध झाले आहे. करिता नियमित योग करून निरोगी रहावे असे प्रतिपादन पतंजली योग समितीचे राज्य सदस्य तथा जिल्हा संरक्षक कुंडलिकराव निर्मले यांनी केले.
पतंजली योग समितीच्या वतीने कळमनुरी येथील केंब्रिज विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सात दिवसीय नि:शुल्क योग व ध्यान शिबिरात ते बोलत होते. कळमनुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन भोसले, पतंजली भारत स्वाभिमानचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल सोळंके, सह प्रभारी बालासाहेब हरण, जिल्हा कोषाध्यक्ष उमेश तोष्णीवाल, महिला प्रभारी ज्योती वाघमारे, योगशिक्षक डॉ.संतोष कल्याणकर, डॉ. शितल कल्याणकर, वनिता गुंजकर, दयानंद कल्याणकर, पूजा चौरसिया, संजय नाईक आदिंच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.
या शिबिरासाठी महिला प्रांत सदस्या माधुरी शास्त्री,पतंजली जिल्हा प्रभारी मन्मथ गुमटे, किसान सेवा समिती प्रभारी ज्ञानदेव गुट्टे,युवा प्रभारी राजकुमार टिळे, पतंजली जिल्हा सह प्रभारी अशोक पवार मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून आशा पवार, सीमा ढाले, काशिनाथराव घुगे, सुनीता घुगे, पंडितराव गुट्टे, आदिसह जिल्ह्यातील अन्य योगशिक्षकही सात दिवसात सेवा देणार आहेत. शहरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.संतोष कल्याणकर, डॉ. शितल कल्याणकर,संजय नाईक,वनिता गुंजकर,तानाजी दासूद, अनुरथ शिंदे, मन्मथ साखरे, रामकिशन मोरे, विजय देवसरकर आदींनी केले आहे.....
0 टिप्पण्या