🌟पहलगाम दहशतवादी हल्ला : महिला म्हणाल्या टिकल्या काढल्यामुळे आम्ही वाचलो ; शरद पवारांना अजून काय पुरावा पाहिजे ? - मनसेचे नेते प्रकाश महाजन
✍️ मोहन चौकेकर
1) महाराष्ट्रात 5023 पाकिस्तानी नागरिक, 107 जण बेपत्ता, फक्त 51 जणांकडे वैध व्हिसा अन् कागदपत्रे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती ; पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश ; नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी नागरिक, तर ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पाकिस्थानी नागरिका
2) काश्मीरातील पाच दहशतवाद्यांची घरं ब्लास्ट करुन उद्ध्वस्त, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आक्रमक, सर्च ऑपरेशन जारी ; पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगला स्थगिती; पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी
3) भारताच्या प्रत्येक हल्ल्याला तोडीस तोड उत्तर,पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं वक्तव्य,सिंधू नदीचे पाणी अडवताच पाकिस्तान बेचैन ; सिंधू घाटीत एकतर पाणी वाहणार किंवा त्यांचे रक्त ; पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांची भारताला धमकी ; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डर बंद, मात्र पाकिस्तानी उच्च आयोगातील अधिकाऱ्यांचा वाघा बॉर्डरवरूनच जाण्याचा अट्टहास, भारताकडे मागितली परवानगी
4) कागदोपत्री घोडे नाचवणं थांबवा, तुम्ही ठोस कारवाई करणार आहात का ? वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारला सवाल ; पहलगामधील दहशतवादी हल्ल्यामध्ये 'संधी' शोधण्याचा विमान कंपन्यांचा नालायकपणा, दिल्लीपर्यंतचे 15 हजारांचे तिकीट दर 65 हजारांवर नेलं, देशभरातून संताप
5) पहलगाम दहशतवादी हल्ला! महिला म्हणाल्या टिकल्या काढल्यामुळे आम्ही वाचलो ; शरद पवारांना अजून काय पुरावा पाहिजे ? मनसेचे नेते प्रकाश महाजनांचा सवाल ; नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठे खिंडार; माजी सभापतीसह 16 सरपंच, 6 नगरसेवकांसह अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
6) वेळ आली आहे एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी तयार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पोस्ट चर्चेत, मनसेसोबत युती होणार का? चर्चेला उधाण ; मनसेकडून ठाकरे गटाला निमंत्रण दिल्यानं भाजप नाराज; प्रतिसभागृहात सहभागी होण्यास नकार
7) मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी माझ्या हितशत्रुंनी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् मंत्री उदय सामंतांच्या भेटीनंतर ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांचं स्पष्टीकरण ; सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी; मुघलांच्या खुणा असलेल्या गावांची नावे बदलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार : गोपीचंद पडळकर
8) बीडमध्ये 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, पोलिसांसोबत आरोपीचे रिल्स समाज माध्यमावर व्हायरल, पीडित कुटुंबियांचा गंभीर आरोप ; परळीत चोरांचा उच्छाद, गुंगीचे औषध खाऊ घालून गाई पळवण्याचा प्रयत्न फसला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9) लोकप्रिय गायक एआर रेहमान आणि मद्रास टॉकीज यांना 2 कोटींचा दंड, दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय ; विक्की कौशलने कधीच म्हणू नये लोक मला बघायला आले, छावा चित्रपटाबाबत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचं वक्तव्य ; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या सिनेमाला फटका, युट्यूबवरुन गाणीही गायब; पहलगाम हल्ल्यानंतर भारतात चित्रपटावर बंदी
10) हैदराबादचा चेन्नईला दणका, 5 विकेट्सने केला पराभव, पराभव जिव्हारी लागल्यानं अभिनेत्री श्रुती हसनच्या डोळ्यात अश्रू ; भारताने पाकिस्तानवर लावलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचं वक्तव्य, म्हणाला, केवळ संवादाद्वारेच पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव कमी होऊ शकतो ; भारताच्या जीवावर पाकिस्तान क्रिकेट चालतं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलं तर पीसीबी चक्काचूर होईल; पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधा रमीझ राजाचं वक्तव्य चर्चेत
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या