🌟देशासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; या वर्षी १०५ टक्के पाऊस.....!

 


🌟तसेच मान्सूनवर अल निनोचा धोका नसल्याने देशात चांगला पाऊस पडेल असेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले🌟 

✍️ मोहन चौकेकर 

भारतीय हवामान विभागाने नुकताच मोसमी पावसाचा अंदाज व्यक्त केला. यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात १०५ टक्के पडेल. पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. तर, महाराष्ट्रात पुरेसा पावसाच्या सरी कोसळतील. तसेच मान्सूनवर अल निनोचा धोका नसल्याने देशात चांगला पाऊस पडेल असेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

हवामान विभागाच्या मते, नैऋत्य मान्सून १०५ टक्के (दीर्घ कालावधीची सरासरी – दीर्घकालीन सरासरी) वर राहू शकतो. त्याच वेळी, एल निनोची स्थिती तटस्थ राहण्याची अपेक्षा आहे. जी मान्सूनला आधार देईल. त्यामुळे देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा आणि शास्त्रज्ञ आर.के. जेनामणी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. हा फक्त पहिला अंदाज आहे. आयएमडीचा पुढील अंदाज मे मध्ये प्रसिद्ध होईल.

देशातील ६० टक्के शेती अजूनही मान्सूनवर अवलंबून आहे. हा अंदाज खरा ठरल्यास सरकारला येणा-या वर्षात अन्नधान्य महागाई नियंत्रित करण्यास मदत होईल. पावसावर अवलंबून असलेल्या राज्यांसाठी हा मान्सून जीवनरेखा ठरू शकतो. स्कायमेटने देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या १०३ टक्क्यांपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. तसेच मान्सून वेळेवर सुरू होईल, म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमधून प्रवेश करेल असेही त्यांनी म्हटले होते.

💫पावसाच्या श्रेणी :-

० टक्के ते ९० टक्के पाऊस – अपुरा पाऊस

९० टक्के ते ९५ टक्के पाऊस – सरासरीपेक्षा जास्त पाऊस

९६ टक्के ते १०४ टक्के पाऊस – सरासरीइतका पाऊस

१०४ टक्के ते ११० टक्के पाऊस – सरासरीपेक्षा जास्त पाऊस

११० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस – सर्वाधिक पाऊस 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या