🌟ग्रामस्वराज्य फाउंडेशन व रयत बहुउद्देशी सेवाभावी संस्थेचा ग्रामीण भागातील कर्तृत्ववान महिलाचा सन्मान....!


🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे पालकमंत्री सौ.मेघनाताई बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आला सत्कार🌟

परभणी/पुर्णा :- परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री सौ.मेघनाताई बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्राम स्वराज्य फाउंडेशन व रयत बहुउद्देशीय सहभागी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिव फंडामेंटल इंग्लिश स्कूल ताडकळस येथे महिला सक्षमीकरणासाठी बचतगटातील शेतकरी  ऊघ्योजक सामाजिक काम करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा साडी चोळी,सन्मानपत्र देऊन  सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामध्ये विविध गावातील एकूण 30 महिलांचा सन्मान करण्यात आला यासाठी बचत सीआरपी स्वाती सुरवसे, प्रगतिशील शेतकरी मीरा आवरगंड सामाजिक कार्यकर्त्या स्वाती दुधाटे, राधा दुधाटे,नीता कापुरे सोनाली भालेराव,ज्योती पवार मनीषा गबाळे व आदी महिलांची उपस्थिती होती

व महिलांना विविध विषयावर ग्रामस्वराज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश सकनुर यांनी महिलांना मार्गदर्शन केले व आपल्या कार्यक्षेत्रातील येणाऱ्या अडीअडचणी सोडून आपल्या सोबत सदैव असल्याचे  सांगितले त्याबरोबरच रयत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ स्वाती सुरवसे यांनी संस्थेच्या माध्यमातून चालणाऱ्या आर्थिक साक्षरता, उद्योजकता, रोजगार व मानसिक आरोग्य ,व इतर शासकीय योजनाची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक गरजू  लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी महिलांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिव फंडामेंटल इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष स्वामी  यांनी केले  ऋषिकेश  सकनुर यांच्या कार्याविषयी  प्रगतशील शेतकरी जनार्धन आवरगड यांनी करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली या कार्यक्रमासाठी महिला बचत गटातील महिलां, उद्योजक  यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश बिराजदार आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या