🌟यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती🌟
पुर्णा :- पूर्णा शहरात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार सम्राट अशोक राजा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
संपूर्ण जगाला धम्माचा संदेश देणारा,युद्धाच्या नरसंहारातून करुणेचा मार्ग निवडणारा महान चक्रवर्ती सम्राट महाराजा अशोक यांनी कलिंगच्या युद्धानंतर हिंसेचा मार्ग सोडून बौद्ध धम्म स्वीकारला आणि अख्ख्या भारतातच नव्हे तर जगभर शांती,करुणा आणि समता यांचा प्रचार केला. त्याने "धम्म" हे राज्यकारभाराचे सूत्र बनवून धम्म विजय घडवून आणला आज रविवार दि.०६ एप्रिल रोजी त्यांची जयंती आहे भारतात मानवता पुन्हा संकटात आहे, तेव्हा अशोकाच्या विचारांची, मूल्यांची आणि कार्याची आठवण होणे अत्यंत आवश्यक आहे सम्राट अशोक म्हणजे सामर्थ्य, आत्मपरीक्षण आणि परिवर्तन यांचं सर्वोत्तम उदाहरण आहे.
पुर्णा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह आंबेडकर नगर येथे आज रविवार दि.०६ एप्रिल रोजी सम्राट अशोक यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड आणि भारतीय बौद्ध महासभा परभणी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बौद्धाचार्य तुकाराम जी.ढगे,जिल्हा सरचिटणीस बौद्धाचार्य गौतमजी दिपके,तालुका अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड बोरगावकर, शहराध्यक्ष बौद्धाचार्य उमेश बाऱ्हाटे, रत्नदीप एगंडे,जिल्हा संघटक ऍड.सिद्धार्थ खरे, विश्वनाथ कांबळे, नरेंद्र सोनुले, गंगाधर अहिरे, मनोज मुळे, भगवान जोंधळे, दिलीप हनवते, केशव मकासरे, राहुल भगत, कुंदन ठाकूर, संतोष राऊत,उत्तम वाघमारे, आनंद गायकवाड,राहुल कचरे यांच्या उपस्थितीत सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.....
0 टिप्पण्या