🌟शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव या मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे मशाल पेटवा आंदोलन......!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवा हे राज्यव्यापी आंदोलन🌟

परभणी - राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवा हे राज्यव्यापी आंदोलन घेण्यात येणार आहे. संबंधित आंदोलन एकाचवेळी महाराष्ट्रातील सर्व २८८ आमदारांच्या घरासमोर दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२ वाजता होणार आहे.

याच आंदोलनाचा एक भाग म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या घरासमोर दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२ वाजता हातात मशाल घेऊन गळ्यामध्ये निळा गमच्या आणि हातामध्ये भगवा झेंडा या पद्धतीचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करण्यात येणार आहे. या आंदोलना दरम्यान संबंधित आमदारांना एक निवेदन सादर करून मतदार संघातील शेतकऱ्यांच्या व्यथा संपूर्ण कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव या दोन मुद्द्यावर संबंधित सन्माननीय आमदार महोदयांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मागणी करावी तसेच विधिमंडळामध्ये या दोन्ही मुद्द्यावरती आवाज उठवावा अशी विनंती प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र देऊन संबंधित आंदोलनाची माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील सन्माननीय आमदार च्या भागात राहतात त्या भागातील पोलीस स्टेशनला या आंदोलनाची सविस्तर माहिती त्या त्या मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने एका निवेदनाद्वारे कळविण्यात आलेली आहे परभणी विधानसभा मतदारसंघातील सन्माननीय आमदारांच्या घरासमोर होणाऱ्या मशाल पेटवा आंदोलनाची माहिती नवामोंढा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आली आहे. या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, तालुकाप्रमुख, उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या