🌟नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व प्रशासकांच्या गैरकारभारा विरोधात धरणे आंदोलन....!


🌟बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व हजूरी सिख समुदायाच्या वतीने धरणे आंदोलनाचे आयोजन🌟

नांदेड (दि.०९ एप्रिल २०२५) :- श्री हजूर साहेब नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व गुरुद्वारा बोर्डावर शासन नियुक्त प्रशासक डॉ.विजय सतबीरसिंघ व गुरुद्वारा बोर्ड अधिक्षक यांच्या गैरकारभार कारभारा विरोधात फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व हजूरी सिख समुदायाच्या वतीने उद्या गुरुवार दि.१० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहेब गुरुद्वारा गेट क्रमांक ०१ येथील दर्शन देवडी समोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारा बोर्डावर महाराष्ट्र सरकार कडून नियुक्त करण्यात आलेले प्रशासक विजय सतबीरसिंघ व गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक यांनी सातत्याने मनमानी व गैरकारभार चालवला असून संबंधित गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक विजय सतबीरसिंघ व गुरुद्वारा बोर्ड अधिक्षक हे गुरुद्वारा बोर्डात कार्यरत भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना पाठबळ देऊन त्यांना वाचवण्याचा तर जेष्ठ कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्यास टाळाटाळ करीत त्यांच्यावर अन्याय करीत आहेत या संदर्भात मागील काळात गुरुद्वारा बोर्डात कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कार्य काळानुसार प्रमोशन देण्यात येईल असे आश्वासन गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ यांनी बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी व हजूरी सिख समुदायाला आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची देखील डॉ विजय सतबीरसिंघ यांनी पुर्तता केली नाही त्यामुळे संपूर्ण हजूरी सिख समुदायात संतापाचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विरोधात उद्या १० एप्रिल रोजी भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व हजूरी सिख समुदायाच्या वतीने आयोजित या धरणे आंदोलनात हजूरी सिख समुदायाने जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री.हजुर साहेब नांदेड येथील बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स.मनवीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी,स.विरेंद्रसिंघ नारायणसिंघ बेदी,स.दिपकसिंघ रतनसिंघ गल्लीवाले,स.जसपालसिंघ ग्यानसिंघ लांगरी,स.प्रितपालसिंघ कमलसिंघ शाहु,स.जसपालसिंघ बलवंतसिंघ लाखवाले,स.अमोलकसिंघ इंदरजितसिंघ गल्लीवाले,स.बक्षिससिंघ भिमसिंघ पुजारी,स.जगदिपसिंघ मोहनसिंघ नंबरदार,स.जसबीरसिंघ हुंदल तथा हजुरी साध संगत श्री. हजुर साहेब नांदेड (महाराष्ट्र) यांच्या वतीने करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या