🌟राज्यातील नगर जिल्ह्यातील शिर्डीत अटक केलेल्या ५१ भिकाऱ्यांतील' चौघांचा रुग्णालयात मृत्यू ?


🌟या मृत्यूंची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आमदार रोहित पवार यांची मागणी🌟

मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर (नगर) जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी देवस्थान परिसरासह शहरात भीक मागण्याच्या आरोपावरून अटक केलेल्या ५१ भिकाऱ्यांपैकी चार जणांचा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काल गुरुवार दि.१० एप्रिल २०२५ रोजी केला या मृत्यूंची सखोल चौकशी करून प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले, "शिर्डीत ५१ जणांना भीक मागत असल्याच्या आरोपावरून अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. त्यांची तब्येत बिघडल्याने काहींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला "या रुग्णांना अमानवी वागणुक दिल्याचे प्रकार समोर येत आहेत" असा आरोप त्यांनी केला..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या