🌟अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी केली🌟
परळी (दि.०४ एप्रिल २०२५) - परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील नवीन वसाहतीत नागरी सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख साप्ताहिक मानपत्र चे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील शंकर साळवे ते सखाराम जगतकर व सुनील आदोडे ते किरण गायकवाड यांच्या घरापर्यंत गेल्या पाच वर्षापासून नवीन वसाहत झाली असून या भागात रोड नाल्या व लाईटची व्यवस्था नसल्याकारणाने येथील नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे येथील नागरिकांनी परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना रोड नाल्या व लाईटची व्यवस्था करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिले असून या निवेदनावर बालासाहेब जगतकर शांताबाई सखाराम जगतकर छायाबाई हजारे सुमित कुमार मनोहर जगतकर वैजनाथ धनराज गोखले गंगाधर जगतकर अनिल जगतकर संभाजी गायकवाड दुर्योधन साळवे मीना संजय भोसले समाधान सिताराम जगतकर सुखशाला अरुण जगतकर रवी रायबोले अर्जुन जगतकर सुनील आदोडे किरण देविदास गायकवाड रशीद मोईन शेख मोईज मोईन शेख हनुमंत कांबळे इत्यादीच्या सह्या असून वरील प्रकारच्या सुविधा लवकरात लवकर देण्यात याव्यात अन्यथा एक मे 2025 पासून आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती ही प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे......
0 टिप्पण्या