🌟यावेळी जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश दादा कांबळे,माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे आदींची उपस्थिती🌟
पुर्णा :- भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पुर्णा शहरातील डॉ आंबेडकर चौक येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आज सोमवार दि.१४ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री १२.०५ वाजेच्या सुमारास पूज्य.भदंत पंयावंश,भिक्खु संघ तसेच जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा रिपाइं नेते प्रकाश दादा कांबळे,परभणी भुषण तथा पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे व सार्वजनिक भिम जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हजारों आंबेडकरी जनसमुदायाने विनम्र अभिवादन केले.यावेळी जय भिम....जय भारत....जय संविधानच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली यावेळी उपस्थित आंबेडकरी अनुयायांना पूज्य.भदंत पंयावंश,जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा रिपाइं नेते प्रकाश दादा कांबळे,परभणी भुषण तथा पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.....
0 टिप्पण्या