🌟पसायदान हेच मानवी जीवनाचे सार हभप.सद्गुरू श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रतिपादन......!


🌟सेलू येथील वसंत प्रतिष्ठान च्या वतीने पसायदान या विषयावर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले🌟 

सेलू (प्रतिनिधी) - श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रचलेले पसायदान हेच मानवी जीवनाचे सार आहे असे प्रतिपादन ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले येथील वसंत प्रतिष्ठान च्या वतीने पसायदान या विषयावर आयोजित प्रवचन मालेचे हे सहावे वर्ष आहे या प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की, पसायदानात मानवी जीवन मूल्ये व अलोकिकता या विषयी विवेचन केले आहे. जीवन कसे असावे व जीवन कसे जगावे याचे सखोल विवरण पसायदानता आहे.

जीवनाची पूर्णता विषद करते ते पसायदान आहे.ज्या वेळी आपल्या अंतःकरण मधून अहंकार निवृत्त होतो तीच आपल्या जीवनाची परमात्म्याला दिलेली खरी पूर्णतः आहे जो जे जसे करील तसेच भरील हेच पसायदान आपल्याला सांगते मानवी जीवन अलोकिक व्हावं हेच यात अभिप्रेत आहे.असे ते म्हणाले प्रारंभी दीप प्रज्वलन करून व ज्ञानेश्वर माउलींच्या तसेच सेलूभूषण तथा माजी नगराध्यक्ष ,श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण संस्थेचे सचिव स्व. वसंतराव खारकर  यांच्या प्रतिमेचे पूजन सद्गुरू चैतन्य महाराज यांनी केले.

तर गुरु पूजन वसंत प्रतिष्ठान च्या वतीने प्रवचन मालेचे आयोजक उद्योजक तथा श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेशराव खारकर व ऍड उमेश खारकर यांनी केले यशवंतराव चारठाणकर यांच्या अवघ गर्जे पंढरपूर या अभंगवानीने श्रोते मंत्रमुग्ध झाले प्रास्ताविक आयोजक महेश खारकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगांवकर यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात श्रोता वर्ग यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या