🌟सुरक्षा दलांनी गेल्या ४८ तासांत १७५ हून अधिक संशयित ताब्यात घेतले आहेत🌟
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर बेछूट गोळीबार व हत्याकांडानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा कमालीची सतर्क झाली असून पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून मोठी कारवाई केली जात आहे. सुरक्षा दलांच्या विविध यंत्रणांकडून संयुक्तपणे ही कारवाई केली जात आहे.
या कारवाईत आतापर्यंत काही दहशतवाद्यांना कँठस्नान घालण्यात आलं आहे. तर काही दहशतवाद्यांची घरे उद्धस्त करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांकडून सध्या दक्षिण काश्मीरमध्ये कारवाई सुरु आहे. सुरक्षा दलांकडून अनंतनाग, पुलवामा, कुलगाम, शोपियामध्ये शोध मोहीम सुरु आहे. विशेष म्हणजे सुरक्षा दलांनी गेल्या ४८ तासांत १७५ हून अधिक संशयित ताब्यात घेतले आहेत. तसेच काश्मीरमध्ये एकूण १४ स्थानिक दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आहेत.
सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जात आहे. तसेच पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांना देखील महत्त्वाचं आवाहन केलं जात आहे. काही संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना तातडीने कळवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. गुप्तचर संस्था जम्मू-कश्मीरमधील स्थानिक दहशतवाद्यांची यादी तयार करत आहे. हे स्थानिक दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करतात. त्यांना आश्रय आणि संसाधने पुरवतात. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत आहे. त्यांच्या घरांवर बुलडोजर चालवला जात आहे. सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर १४ दहशतवादी आहेत.......
0 टिप्पण्या