🌟सर्वोच्च न्यायालयात दाखल वक्फ सुधारणा विरोधातील याचिकांवर १६ रोजी सुनावणी......!


🌟दरम्यान केंद्र सरकारने देखील सुप्रीम कोर्टात एक कॅव्हेट दाखल केले आहे🌟

नवी दिल्ली :  लोकसभा आणि राज्यसभेत प्रदीर्घ चर्चा आणि आरोप-प्रत्यारोपानंतर बहुमाताने पारीत झालेल्या वक्फ सुधारणा विधेयका विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर १६ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

भाजपचे महत्वाकांशी असलेल्या वक्फ सुधारणा विधेयक या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात आवाजी मतदानाने पारीत करण्यात आले. या विधेयकाला राष्ट्रपतींनी देखील मंजुरी दिल्याने या विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. या विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दोन्ही सभागृहात व सभागृहाबाहेर खडाजंगी झाली होती. अनेकांनी या विधेयकाचे स्वागत देखील केलेले आहे. या विधेयका विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात १६ एप्रिल रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारने देखील सुप्रीम कोर्टात एक कॅव्हेट दाखल केले आहे. आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय देऊ नये अशी मागणी यामधून करण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या