🌟उमरी ते शिर्डी पदयात्रा नांदेड जिल्ह्यात परतली.....!


🌟संत श्री दासगणू महाराज यांच्या कृपा आशीर्वाद लाभलेल्या उमरी ते शिर्डी पदयात्रेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद🌟

नांदेड - संत श्री दासगणू महाराज यांच्या कृपा आशीर्वाद लाभलेल्या उमरी ते शिर्डी पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शिर्डीतील राम नवमी उत्सवात सहभागी होऊन पदयात्रा नांदेड जिल्ह्यात परतली. यात्रेचे ठिक ठिकाणी उत्स्फूर्त असे स्वागत झाले.

मराठवाड्यातुन मानाची ठरलेली उमरी ते शिर्डी ही पदयात्रा मागील १४  वर्षापासून आयोजित करण्यात येते. यात्रा समितीचे अध्यक्ष गोपाल राठोर, मुख्य प्रर्वतक विष्णूभाऊ अट्टल,कार्यकारी अध्यक्ष अशोक मामीडवार, सुभाष गोरठेकर,उपाध्यक्ष महेश नग्नूरवार (हुंडेकर), कृष्णा देशमुख,संदीप लापशेतवार यांच्या पुढाकाराने ही यात्रा होते.  जवळपास पंधरा दिवस चाललेली  ही पदयात्रा रामनवमीच्या दिवशी शिर्डी येथे दाखल झाली. शिर्डी येथे शिर्डी संस्थानच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले. श्री संत कवी दासगणु महाराज साई भक्त मंडळ गोरटे संचलित पालखीत जवळपास सव्वाशे भाविक भक्त सामील झाले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या