🌟जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीने हाहाकार,पूर आणि भूस्खलनात सरकारी शाळा,रस्ते, घरे वाहून गेली🌟
1. सोलापूरचे न्यूरोफिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्येनंतर त्यांच्याच रूग्णालयातील कर्मचारी महिलेला अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी, सुसाईड नोटमधील नोंदीनुसार कारवाई ; आर्थिक व्यवहार अन् कामावरून काढल्यानंतर डॉ. वळसंगकरांना महिला कर्मचाऱ्याकडून धमकी ; ज्यांना शिकवून अधिकारी केलं, चांगला पगार देतोय, त्यांनीच माझ्यावर घाणेरडे आरोप करुन धमकावले, डॉ. वळसंगकर यांची सुसाईड नोट समोर
2. महाराष्ट्र द्रोह्यांसह पंक्तीला बसणारेही महाराष्ट्रद्रोहीच, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीसाठी कोणतीही अट ठेवली नसल्याचं केले स्पष्ट ; भोंग्याविरोधी आंदोलनात 17 हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल, 2017 मध्ये झालेला युतीचा प्रयत्न उद्धव ठाकरेंमुळेच अयशस्वी झाल्याचा आरोप
3. बडतर्फ पोलिस निरीक्षक रणजीत कासलेला निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती, बीड प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर ; रणजीत कासलेच्या मुलांच्या फीसाठी त्याच्या अकाऊंटवर 10 लाख पाठवले, बीडमधील बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीचा दावा ; माजी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रणजीत कासलेवर तिसरा गुन्हा दाखल, बीडमधील व्यापाऱ्याकडून सहा लाख घेतल्याचा आरोप
4. विधानसभेआधी मी राजीनामा दिला होता, पण अजित पवारांनी तो स्वीकारलेला नाही, समीर भुजबळांचा दावा ; समीर भुजबळ हा अजित पवारांकडून पक्षातून हाकललेला माणूस, त्यांची कीव येते, शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंची समीर भुजबळांवर जोरदार टीका ; नांदगाव मतदारसंघातून समीर भुजबळ जर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले असते निवडून आले असते, छगन भुजबळांचे वक्तव्य
5. तीन टर्म निवडून आल्यानंतरही पक्षाने संधी दिली नाही, सत्ता असताना कामंही केली नाहीत, काँग्रेसचा हात सोडणाऱ्या माजी आमदार संग्राम थोपटेंची खदखद, 22 एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करणार ; वडील 14 वर्षे मंत्री, स्वत:ही तीन वेळेस आमदारकी मिळवली, आता काँग्रेस सोडून भाजपात जाणार माजी आमदार संग्राम थोपटे
6. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल, सूर्या, मणिपाल, इंदिरा आयव्हीएफ रूग्णालयंही पोलिसांच्या रडारवर
7. विदर्भात तापमानाचा भडका, उपराजधानी नागपुरात 44.7 अंश, परभणीत 43.6 अंश तापमानाची नोंद, तर कोकण आणि मुंबईत उकाड्याने नागरिक हैराण
8. मराठी चित्रपटांच्या शिरपेचात मानाचा तुरा, स्थळ, स्नो फ्लॉवर, खालिद का शिवाजी, जुनं फर्निचर या चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड
9. जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीने हाहाकार, पूर आणि भूस्खलनात सरकारी शाळा, रस्ते, घरे वाहून गेली, हायवे चिखलाने माखला, तीन जणांचा मृत्यू, 100 जणांना वाचवण्यात यश
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या