🌟पुर्णा शहरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाने केले विनम्र अभिवादन.....!


🌟महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती मिरवणूकीत लोटला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय🌟


(महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास १३४ व्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करतांना उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील)

पुर्णा :- महाराष्ट्र राज्यातील नागपूर नंतर आंबेडकरी चळवळीचे सर्वात मोठे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा नगरीत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनी सोमवार दि १४ एप्रिल २०२५ रोजी महामानव डॉ.आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य जयंती मिरवणूकीत हजारोंच्या संख्येने आंबेडकरी जनसमुदाय सहभागी झाला होता अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत निघालेल्या जयंती मिरवणूकीत अबालवृद्ध माता-भगिनींसह तरुणांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.


(महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास १३४ व्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करतांना पोलिस निरीक्षक विलास गोबाळे)

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने  सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास शहरातील डॉ.आंबेडकर चौक येथील महामानव भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास जयंती मंडळ पदाधिकारी तसेच आजी/माजी लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आदींच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या नंतर भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक अमितजी जोंधळे यांच्या हस्ते धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्या नंतर पुर्णा रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन प्रबंधक राजु भिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर ११.०० वाजेच्या सुमारास शहरातील बुद्ध विहार येथे अखिल भारतीय भिख्खू महासंघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर त्रिशरण पंचशिल बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली यावेळी भन्ते पंयावंश भन्ते पंयावंत भन्ते पंयासार उपस्थित होते.

त्या नंतर शहरातील शांतीनगर परिसरात येथे जेष्ठ पत्रकार तथा सेवानिवृत्त शिक्षक विजय बगाटे सर यांच्या हस्ते धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्या नंतर डॉ आंबेडकर नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे भुजंगराव कांबळे यांच्या हस्ते धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्या नंतर जयंती मिरवणूकीतील चांदीच्या रथाततील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस भिक्खु संघ व जयंती मंडळाच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती मिरवणूकीस सुरवात करण्यात आली मिरवणूकीत पारंपरिक वाद्यांसह आकर्षक अशा लेझीम पथकाचा देखील सहभाग होता ही मिरवणूक सिद्धार्थ नगर रेल्वे कॉलनी परिसर,विजय नगर,भिमनगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर (महादेव मंदीर),सराफा बाजार छत्रपती शिवाजी महाराज चौक,महात्मा बसवेश्वर चौक मार्गावरुन वाजतगाजत निघून रात्री ०८.०० वाजेच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात मिरवणूकीचे विर्सजन करण्यात आले.

यावेळी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मिरवणूकीत पुर्णेचे उपविभागीय अधिकारी समाधान पाटील,पोलिस निरीक्षक विलास गोबाळे, पुर्णा तहसिलचे नायब तहसिलदार प्रशांत थारकर जेष्ठ नेते तथा पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम, पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष हाजी साहब कुरेशी, जेष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा जेष्ठ रिपाइं नेते प्रकाश दादा कांबळे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष तथा पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे, जयंती मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी चक्रवर्ती वाघमारे,ॲड हर्षवर्धन गायकवाड ॲड धम्मा जोंधळे राजकुमार सुर्यवंशी अनिल खर्गखराटे विरेश कसबे दिलीप हनुमंते देवराव खंदारे यादवराव भवरे अशोक धबाले रौफ कुरेशी तुषार गायकवाड यांच्या सह हजारो अनुयायी जयंती मिरवणूकीत सहभागी झाले होते.

महामानव भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी ११ वाजता डॉ.आंबेडकर चौक येथे शाहीर विजय सातोरे यांचा भिम व बुद्ध गितांचा कार्यक्रम देखील संपन्न झाला.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या