🌟महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील विज निर्मितीसाठी कोळसा उत्पादन ते वापरापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सखोल विश्लेषण करून, सर्वोत्तम दर्जाचा कोळसा, कमी खर्चात, योग्य वेळेत मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. 'महाजनको' ने गारे पेल्मा दोन जीपी-२ कोळसा खाणीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षतेखाली यांच्या कोळसा खाणीसंदर्भात शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महाजनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यावेळी उपस्थित होते.
छत्तीसगड येथील रायगढ जिल्ह्यातील गारे पेल्मा दोन कोळसा खाणीला शासनाच्या सर्व परवानग्या प्राप्त करून 'महाजनको' ने उत्पादनाबाबत कोळसा सर्वसमावेशक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून त्याला मान्यता घ्यावी. वीज निर्मितीत उत्पादन खर्च कमी करून ग्राहकांना कमी दरात वीज द्यावी यासाठी 'महाजनको' ने कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
💫राज्यातील एमआयडीसी असलेल्या गावांना देणार औद्योगिक नगरीचा दर्जा :-
एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकास करता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरी देण्यासंदर्भात धोरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, सचिव नवीन सोना, उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु, सहमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक वेगाने करण्यासाठी अशा एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास त्या गावांच्या विकासाबरोबरच संबंधित भागात मूलभूत सुविधा आणि पायाभूत प्रकल्पांचा विकास वेगाने होईल. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा, रस्ते, वीज आणि इतर सुविधा सुधारणे यावर भर दिला जाईल.....
0 टिप्पण्या