🌟दिवंगत प्रसिद्ध सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन प्रकरणी न्यायाधीश बदलले....!

 


🌟दिशाचे वडिल सतिश सालियन यांना पहिला मोठा दिलासा🌟

मुंबई :- दिवंगत प्रसिद्ध सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी न्यायालयात पहिल्याच सुनावणीत सतिश सालियन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे प्रकरण आता न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांच्या ऐवजी दुसऱ्या खंडपीठासमोर घेण्याचे निर्देश आज उच्च न्यायालयाने दिले.

गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियन मृत्यू प्रकरणी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. याप्रकरणात दिशाचे वडील सतिश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात रशिदखान पठाण यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेसोबत आपली फौजदारी रिट याचिका जोडण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली होती. ही याचिका न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणीसाठी येणार होती. तत्पूर्वीच मयत दिशाचे वडील सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण यांच्या सख्ख्या बहिण आहेत. वंदना चव्हाण या सक्रिय राजकारणी असून त्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षात आहेत. त्यामुळे, विविध कारणांमुळे उद्या हे प्रकरण न्यायालयाकडूनच दुसऱ्या खंडपीठासमोर घेऊन जा, असं सांगितलं जाण्याची शक्यता आहे, असे निलेश ओझा यांनी पत्रकार परिषदेतून म्हटले होते. त्यानुसार, आज सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने खंडपीठ बदलून देण्याची विनंती करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांची ही विनंती न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाकडून मान्य करण्यात आली असून आता लवकरच या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठा पुढे ही सुनावणी होणार आहे. उद्याच तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे निलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या