🌟महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजनांच्या शिक्षणाची दारे खुली केली - प्राचार्य डॉ रामेश्वर पवार


🌟पुर्णा येथील स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयात महात्मा फुले जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले🌟

पुर्णा (दि.१२ एप्रिल २०२५) :- राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी खऱ्या अर्थाने भारतीय समाज व्यवस्थेतील बहुजनांच्या शिक्षणाची दारे खुली  केली असे प्रतिपादन येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी  पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी केले ते राष्ट्रपिता सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की ,भारतीय समाजव्यवस्थेत गोरगरीब व उपेक्षित शोषितांना सर्वप्रथम महात्मा ज्योतीराव फुले यांनी शिक्षणाचा अधिकार बहाल करून त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली सत्यशोधक समाजाची स्थापना करून महात्मा ज्योतीराव फुले यांनी सामाजिक व धार्मिक  कार्यात फार मोठ्या सुधारणा केल्या. त्यामुळे महात्मा फुले यांचे भारतीय समाजीक चळवळीतील योगदान   नाकारता येण्यासारखे नाही असेही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

याप्रसंगी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच महाविद्यालयातील गृहविज्ञान विभाग प्रमुख तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुरेखा भोसले, सिनेट सदस्य डॉ. विजय भोपाळे , महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ प्रभाकर सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जीवनकार्यावर आपल्या प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपमाला पाटोदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.प्रकाश सूर्यवंशी यांनी मानले याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या