🌟सर्वोच्च न्यायालय म्हणाले याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची गरज नाही🌟
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी नुकतेच सर्वोच्च न्यायालयासह सरन्यायाधीश यांच्या विरोधात वक्तव्य केले होते या संदर्भात खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यासाठी एका वकिलाने परवानगी मागितली असता सर्वोच्च न्यायालयाने सोमवार दि.२१ एप्रिल २०२५ रोजी स्पष्ट केले की खासदार दुबे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाहीं.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सर्वोच्च न्यायालया बाबत केलेल्या वक्तव्यांमुळे देशात खळबळ माजली आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा वकिलाने सांगितले की सर्वोच्च न्यायालया विरोधात व सरन्यायाधीशांविरोधात वक्तव्ये केली जात आहेत त्यावर न्या.बी.आर. गवई म्हणाले की तुम्हाला काय करायचे आहे ? त्यावर वकिलाने सांगितले की, मी अवमान खटला दाखल करू इच्छितो त्यावर न्या. गवई म्हणाले की, तुम्ही ते दाखल करू शकता आमच्या परवानगीची गरज नाही. तुम्हाला महाधिवक्त्यांच्या परवानगीची गरज लागेल.
💫खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात सरन्यायाधीशांना पत्र :-
यापूर्वी वकील नरेंद्र मिश्रा यांनी सरन्यायाधीश व सुप्रीम कोटांच्या न्यायाधीशांना पत्र लिहून निशिकांत दुबे यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती. दुबे यांनी कोर्टाविरोधात केलेले सार्वजनिक वक्तव्य अपमानजनक व भडकाऊ आहेत. ही वक्तव्ये न्यायपालिकेला घाबरवणारी, राज्यघटनेचे संरक्षण करणाऱ्या संस्थाची बदनामी करणारी आहेत, असे पत्रात नमूद केले होते......
0 टिप्पण्या