🌟केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिली माहिती🌟
दिल्ली (वृत्तसेवा) - लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले असून त्यावर आता जोरदार चर्चा सरू आहे या दरम्यान रिजिजू यांनी विरोधी पक्षांकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप केला आहे तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने वक्फ दुरुस्ती विधेयकाला तीव्र विरोध केला आहे याचबरोबर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनीही या वक्फ दुरुस्ती विधेयकाला केविलवाणा विरोध केला आहे या विधेयकावर बोलतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र राज्यातील बीड येथील कंकालेश्वर मंदिराच्या जमिनीचा ही उल्लेख केला बिड येथील कंकालेश्वर मंदिराची १२ एक्कर जमिन वक्फ बोर्डाने जबरदस्तीने ताब्यात घेतलेली आहे याचबरोबर वडांगे गावातील महादेव मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला होता असेही त्यांनी स्पष्ट केले.
संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण ताकदीने त्याचे समर्थन केले. ते म्हणाले, माझ्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्याने मांडलेल्या विधेयकाचे मी समर्थन करतो. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू असलेली चर्चा मी लक्षपूर्वक ऐकत आहे. मला वाटते की अनेक सदस्यांचे खरोखरच किंवा राजकीय कारणांमुळे अनेक गैरसमज आहेत. ते पुढे म्हणाले की, २०१३ मध्ये, तुष्टीकरणासाठी वक्फला एका रात्रीत अतिरेकी स्वरूप देण्यात आले. यामुळे, दिल्लीतील १२३ सरकारी मालमत्ता वक्फला देण्यात आल्या. दिल्ली वक्फ बोर्डाने उत्तर रेल्वेची जमीन वक्फच्या नावावर घोषित केली. हिमाचल प्रदेशात, वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केलेल्या जमिनीवर बेकायदेशीर मशिदी बांधण्यात आल्या. तामिळनाडूमध्ये, १५०० वर्षे जुन्या मंदिराची जमीन वक्फला देण्यात आली....
0 टिप्पण्या