🌟दिल्लीत राफेल खरेदी संदर्भात भारत-फ्रांस करार : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केली २६ राफेल विमान खरेदी....!

 


🌟यामुळे आगामी काळात भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता बळावत चालली आहे🌟

नवी दिल्ली : जम्मू कश्मीर राज्यातील  पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमीका घ्यायला सुरुवात केली आहे आज सोमवार दि.२८ एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत भारतीय हवाई दलासाठी २६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार भारताने फ्रांस सरकारसोबत केला आहे यामुळे आगामी काळात भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता बळावत चालली आहे.

जम्मू कश्मीरमधील पहलगाम जवळील बैसरन या पर्यटनस्थळावर २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात २८ पर्यटक मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर काही निर्बंध घातले आहेत. सिंधू नदीचे पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या कठोर भूमीके मुळे पाकिस्तानमध्ये पाणी-बाणी   निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान सरकारच्यावतीने भारत आज फ्रांसकडून २६ लढाऊ राफेल विमान खरेदी करण्याचा ६३ हजार कोटींचा करार करण्यात आला. यावेळी भारतीय संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि दोन्ही देशांचे राजदूत उपस्थित होते. त्यामुळे देशसेवेसाठी आयएनएस  विक्रांत या लढाऊ नवकेवर राफेल एम जेट्स ही ही लढाऊ विमाने मिग- २९ लढाऊ विमानांची मदत करणार आहेत. या अगोदर भारतीय वायु सेनेत ३६ राफेल लढाऊ विमानांचा ताफा होता. यात आता राफेल लढाऊ विमानांची संख्या ६२ इतकी होणार आहे. सध्या ३६ राफेल लढाऊ विमाने ही अंबाला आणि हासिमरा येथे तैनात आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या