🌟पुर्णेतील स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार कनिष्ठ महाविद्यालयाचे सहशिक्षक दत्ता पवार यांचे ह्रदयविकाराने दुःखद निधन...!


🌟त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,दोन लहान लहान मुल व वयोवृद्ध आईवडील असा परिवार आहे🌟

पुर्णा :- पुर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार कनिष्ठ  महाविद्यालयातील प्राध्यापक दत्ता पवार यांचे दि.०२ एप्रिल २०२५ रोजी दुपारच्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले प्रा.दत्ता पवार हे ४०% अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत होते.

प्रा.दत्ता पवार अंत्यत मनमिळाऊ स्वभावाचे व प्रत्येकाला वेळोवेळी सहकार्य करणारे शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती ग्रंथालय संघ व ग्रंथालय चळवळीत उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक वेळा त्यांचा सन्मान करण्यात आला होता अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक समन्वय संघात टप्पा अनुदान मंजूर करण्यात यावे यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलनात सहभाग नोंदवला होता शासनाकडून २०%अनुदान चा प्रतिक्षेत ते होते परंतु  शासनाने मंजूर करण्यात आलेली पगारवाढ न दिल्यामुळे त्यांच्या मनावर  ताण आला होता त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,दोन लहान लहान मुल व वयोवृद्ध आईवडील असा परिवार आहे

त्यांच्या पार्थिवावर दि.०२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पुर्णा तालुक्यातील त्यांचा मुळगावी वझुर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या