🌟स्व.येंमजी राठोड दादा आजोबा यांना कोटी कोटी अभिवादन🌟
✍️व्यक्ती आणि व्यक्तीमत्व :- लेखक - सुभाष राठोड
सेवानिवृत्त पोलिस अधिकारी
यवतमाळ (व्यक्ती आणि व्यक्तीमत्व) :- यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातील रामपूर नगर सावरगाव (गोरे) स्व.येंमजी रेवा लक्ष्मण राठोड दादा (आजोबा) यांची आज १४ एप्रिल २०२५ रोजी पुण्य तिथी त्यांच्या पुण्य तिथी निमित्त त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन.... स्व.येंमजी रेवा लक्ष्मण राठोड दादा (आजोबा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा विशेष लेख......
स्व.येमजी राठोड हे मूळ इनापूरचे त्यांना ०६ मुली ०३ मुले होते .
आता एकच मुलगा सुंदरसिंग राठोड हयात जिवंत आहे.
सुंदरसिंग राठोड यांचे शिक्षण ०५ वी पर्यंतचे त्यांना एकूण मुले ०३ मुली आहे.
सर्वात मोठा मुलगा सुभाष राठोड सेवानिवृत पोलिस अधिकारी आहे तर शंकर राठोड ,संतोष राठोड पोलीस हवालदार खंडाळा पुसद, कारंजा वाशिम येथे आहे स्व.मनोहर राठोड,सुन वंदना मनोहर राठोड माजी सरपंच आहे तर मुलगी इंदल बाई गावात राहतात आहे त्याचा एक मुलगा राज्य राखीव पोलिस नागपूर येथे असून मुलगी शीला बाई पुसद येथे राहते.यांची दोन्ही मुले पुसद,नांदेड येथे सरकारी सेवा देत आहे.
मुलगी कमल बाई किरण चव्हाण हे दोघे नरसी नामदेव हिंगोली येथे पोलीस हवालदार आहेत.
रामपूर नगर चे नायक समधी स्व.उदेभान काळू आडे यांचे निमंत्रणावरून स्व.येंमजी राठोड कुटूंबासह रामपूर नगर येथे स्थायिक झाले या ठिकाणी त्यांनी काबाडकष्ट करन जवळपास ३० एकर शेती घेऊन त्या शेतीत दोन विहीर बांधून शेती व्यवसाय करीत एक सधन शेतकरी बनून त्यांनी प्रतिष्ठित जीवन जगत आपल्या अपत्यांना उच्च शिक्षण दिले भावकीचे बाबा पांडू राठोड,झापा पांडू राठोड या दोघे भावास घरीच ठेऊन शेती काम करून घेत होते त्यांची लग्न लाऊन देऊन त्यांनी त्यांना घरातच ठेवले होते त्यांना ०७ एकर शेती दिली होती त्यांचा कडे मोठ्या प्रमाणात गायी,बकरी, म्हशी,कोंबड्या बैल होते मुलगा सुंदरसिंग घरचा शेतीचा कारोबार पाहत असे.मुलगा स्व.चंद्रभान गायी चारत असे,स्व.केशर घरीच टेलर काम करीत असे १० वी पास होते साल गडी मजूर चे वापर करून चांगली उत्पन देणारी शेती करीत असे जोड धंदा म्हणून पिठाची गिरणी, किराणा दुकान,टेलरिंग व्यवसाय सुरू केले होते.
दोन विवाहित मुलीस गावातच सोबत ठेवले होते स्व.येंमजी राठोड यांचे प्रभावी व्यक्तिमत्व होते साधी राहणी उच्च विचार ठेवत होते.
संपूर्ण कुटुंब परिवार,सोयरे,महंत,साधू,शेजारी,गावकरी,सरकारी अधिकारी,सर्व जाती धर्मावर प्रेम करीत होते आता त्यांचा फार मोठा उच्च शिक्षित परिवार आहे.
आज सुधा त्यांची कर्तव्यदक्ष मोठीसून धर्मीबाई सुंदरसिंग,नातू सुन अनुसया बाई सुभाष घरात त्याचे फोटो जवळ उदबत्ती,तेल दिवा,नैवद्य लाऊन देवासारखे पूजा नियमित करीत त्यांचे आशीर्वाद प्राप्त करीत आहेत.
आज सोमवार दि.१४ एप्रिल रोजी पुण्यतिथी असल्याने आम्ही स्व. येंमजी राठोड दादा आजोबा यांना कोटी कोटी अभिवादन करीत आहेत...
✍️व्यक्ती आणि व्यक्तीमत्व :- लेखक - सुभाष राठोड
सेवानिवृत्त पोलिस अधिकारी
0 टिप्पण्या