🌟बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाने केले नाही ते भारतीय जनता पक्षाने केले - उध्दव ठाकरे


🌟उद्धव ठाकरेंनी केलेल्या टिकेवर एकनाथ शिंदे यांचा पलटवार म्हणाले ठाकरेंना गांधींची सोबत मिळाल्याने जिनाची आठवण🌟 


मुंबई :
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा वक्फ बोर्ड विधेयकाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्याचा डाव रचत आहे बॅरिस्टर जिन्ना याने केले नाही ते भारतीय जनता पक्षाने केले असल्याची जोरदार टीका शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर केली आहे.

वक्फ बोर्ड विधेयक मुस्लिम हिताचे आहे असा दावा भारतीय जनता पक्ष करत असेल तर भाजपने हिंदुत्व सोडलं का असा प्रश्न उपस्थित करत उध्दव ठाकरे यांनी भाजपची कोंडी केली. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधींची सोबत मिळाल्याने बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्नाची आठवण यांना झाली असा पलटवार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. देशात महागाई, बेरोजगारी वाढत आहे. भारताने कर कमी केले नाही, तर आम्ही कर वाढवू असा इशारा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे. तर दुसरीकडे शेअर मार्केट कोसळत आहे. महागाई गगनाला भिडली आहे, हे पाहून देशावरती आर्थिक संकट येणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र यावर चर्चा होत नाही. बाकीचे विषय हाती घेऊन राजकारण केले जात आहे, असे ठाकरे म्हणाले. भाजपाचे सगळे नेते मुस्लिमांचे गुणगान गात आहेत. मग हिदुत्व सोडले कोणी? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

💫वक्फ बोर्डाच्या जमिनी आपल्या मित्राच्या घशात घालण्याचा डाव  - उध्दव ठाकरे

वक्फ बोर्डाने कधीही संसदेच्या जमिनीवर दावा केलेला नाही. मंत्री किरण रिजिजू यांनी भाषणात सांगितले की, वक्फने संसदेच्या जमिनीवर दावा केला होता परंतु वक्फ बोर्डाच्या जमिनीवरच सत्ताधाऱ्यांचा डोळा असल्याचे वृत्त प्रसारित झाल्याचे ठाकरे म्हणाले दरम्यान वक्फ बोर्डाच्या जमिनी आपल्या मित्राच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या