🌟या विरोधात अनेक विद्यार्थ्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात खटले केले दाखल🌟
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एकामागून एक वादग्रस्त निर्णय घेण्यास सुरुवात केली असून अमेरीकेने एक हजाराहून अधिक परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रोखल्याने आता नवीन वादाला सुरुवात झाली असून या विरोधात अनेक विद्यार्थ्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात खटले दाखल केले आहेत.
अमेरिकी सरकारच्या व्हिसा रद्द केल्याच्या निर्णयामुळे ताब्यात घेण्याची किंवा निर्वासित केले जाण्याची भीती या विद्यार्थ्यांमध्ये पसरली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, मेरीलँड विद्यापीठ, ओहियो स्टेट विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आतापर्यंत १६० महाविद्यालये व विद्यापीठांतील १,०२४ व्हिसा रद्द केले गेले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर संकट उभे राहिले आहे......
0 टिप्पण्या