🌟तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक विजय सतबीरसिंघ यांनी वाढविले पाठीसिंघांचे मानधन🌟
नांदेड :- सचखंड गुरुद्वारा अंतर्गत भाविकांकडून च्या अखंड पाठ आयोजन करण्यात येते. यामध्ये मागील सतरा वर्षापासून पाठ करणाऱ्यांना मानधनात वाढ करण्यात आली नव्हती हजुरी पाठी संघटनेच्या वतीने प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांना निवेदन देऊन मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. याबाबत प्रशासक सतबीरसिंघ यांनी सकारात्मक निर्णय घेऊन मानधनात वाढ केल्याने हजुरी पाठी संघटनेच्या प्रयत्नांना यश आल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
सिख धर्मियांचे दहावे गुरु श्री गुरुगोविंदसिंघजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत सचखंड श्री गुरुद्वाऱ्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे जगभरातील भाविक या ठिकाणी आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर विविध प्रकारचे पाठ आयोजन करतात. यात श्रीदशम ग्रंथ पाठ, जाप साहेब पाठ, अखंड पाठ, जपजी साहेब पाठ यांचा समावेश आहे. या कामांसाठी पाठीसिंघाच्या 17 वर्षापासून मानधनामध्ये वाढ करण्यात आली नव्हती. यापूर्वी 2009 मध्ये तत्कालीन प्रशासक डॉ.परविंदरसिंघ पसरिचा यांनी वाढ केली होती.
वाढती महागाईमुळे या पाठीचे मानधन कमी पडत असल्याने हजुरी पाठी संघटनेने प्रशासकांना निवेदन देऊन मानधनात वाढ करण्याची मागणी केली असता त्यांनी गांभीर्याने दखल घेत मानधनात वाढ केली आहे.त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात असून हजुरी पाटी संघटनेचे अध्यक्ष दलजितसिंघ बिशनसिंघ हजुरी पाठी, उपाध्यक्ष प्रदीपसिंघ जीतसिंग रागी, सचिव जगदिपसिंघ मोहनसिंघ नंबरदार, महेंद्रसिंघ पैदल, हुकमसिंघ काराबिन, देवेंद्रसिंघ महाजन व यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या