🌟अनकापल्ली जिल्ह्यातल्या कोटावुराटमध्ये अवैध पद्धतीने हा फटाके कारखाना सुरू होता🌟
आंध्र प्रदेश राज्यातील अनकापल्ले जिल्ह्यात अवैध चालणाऱ्या एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात कारखान्यात काम करणाऱ्या ८ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
कारखान्यातील स्फोटाचा आवाज इतका भयंकर मोठा होता की लोकांना तो अनेक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. अनकापल्ली जिल्ह्यातल्या कोटावुराटमध्ये अवैध पद्धतीने हा फटाके कारखाना सुरू होता. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्फोटामुळे कारखान्याला भीषण आग लागली होती ती अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर विझवली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेची माहिती घेत, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना सूचना केल्या आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.....
0 टिप्पण्या