🌟राज्याचे मा.राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्रासह राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा रक्तदान करून केला अनोखा निषेध...!


🌟परभणी तालुक्यातील माळसोन्नातील शेतकरी दाम्पत्य आत्महत्येचा निषेध करण्यासाठी बच्चू कडू यांनी केले रक्तदान🌟

परभणी - तालुक्यातील माळसोन्ना येथील सचिन जाधव व ज्योती जाधव या तरुण शेतकरी दाम्पत्याने नापिकी व कर्जबाजारी मुळे आत्महत्या केली त्या कुटुंबाची भेट काल माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली होती आणि राज्यभरात होणाऱ्या शेतकरी आत्महत्याच्या पाठीमागे राज्य शासनाने कर्जमाफी व शेतीमालाला भावना मिळणे हे कारणे असून त्यातूनच शेतकरी आत्महत्या घडत आहेत या घटनेचा निषेध करण्यासाठी आज दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या व शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्या सरकारच्या विरोधात रक्तदान करून वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. यावेळी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः रक्तदान केले त्यांच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, प्रहार चे कार्यकर्ते व गावातील अनेक नागरिकांनी मिळून ७२ जणांनी रक्तदान केले.

सचिन जाधव व ज्योती जाधव या तरुण शेतकरी दांपत्याची आत्महत्या दुर्दैवी आहेच शिवाय याहीपेक्षा दुर्दैवाची बाब मध्ये म्हणजे ज्यावेळी ज्योती जाधव यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्या सात महिन्याच्या गरोदर होत्या सात महिन्याचे बाळ पोटामध्ये असताना शेतकरी महिलेने नापिकी व कर्जबाजारी मुळे आत्महत्या करणे हे अत्यंत विदारक चित्र आहे आणि हा व्यवस्थेने आणि केंद्र व राज्य सरकारने एकत्र मिळून केलेला खून आहे अशा तीव्र शब्दात बच्चू कडू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या पूर्वी सभा घेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा करणार अशा घोषणा दिल्या होत्या आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आमिष दाखवून सत्ता मिळवली परंतु सत्तेमध्ये आल्यानंतर देवेंद्र फडणवीस व त्यांचा सरकारने शेतकऱ्यांना नागविनायचे काम केले कर्जमाफी न करता उलट शेतकऱ्यांची सक्तिने कर्ज वसुली केली जात आहे आणि यातूनच जाधव दांपत्याने आत्महत्या केली.

शेतकऱ्यांनी यापुढे आत्महत्या न करता व्यवस्थेची हत्या करा पण स्वतः आत्महत्या करू नका अशा तीव्र भावना यावेळी बच्चू कडू यांनी व्यक्त केल्या यावेळी त्यांच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, परभणी तालुकाप्रमुख उद्धव गरुड, पूर्णा तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के यांच्यासह परिसरातील शेतकरी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या