🌟पुर्णा तालुक्यातील गौर येथे लाभदायक कार्यक्रमांतर्गत व्याख्यान संपन्न.......!


🌟या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोपानराव जोगदंड हे होते🌟

पुर्णा (दि.१४ एप्रिल २०२५) :- पुर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक  सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या वतीने पूर्णा  तालुक्यातील मौजे गौर येथे स्थानिकांसाठी लाभदायक उपक्रमांतर्गत अंधश्रद्धा निर्मूलना समोरील आव्हाने आणि उपाय या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोपानराव जोगदंड होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ .शारदा बंडे , प्रा. डॉ.दीपमाला पाटोदे या उपस्थित होत्या तर  विचार मंचावर गावचे प्रतिष्ठित नागरिक विश्वनाथ जोगदंड आणि पोलीस पाटील रामकिशन पांचाळ हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समन्वयक डॉ .प्रकाश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाची सविस्तर अशी भूमिका मांडली याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. शारदा बंडे यांनी समाज जीवनात कोणत्याही घटनेला अंधश्रद्धेशी जोडू नये आपल्या सभोवताली काही वाईट घटना घडत असतील तर त्या घटनेला अंधश्रद्धेशी जोडणे थांबवावे शिक्षण घेऊन डोळसपणे सकारात्मक भावना शोधण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असते असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. 

प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. दिपमाला पाटोदे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी १९८९ साली केल्याचे सांगत ,अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराचा विचार  करते , विकृत विचार धारेच्या विरोधात लढा पुकारते. समाजात राहणाऱ्या लोकांमध्ये काही प्रमाणात अंधश्रद्धा - श्रद्धा असतात त्या कधी भीतीतून तर कधी का असाह्यतेतून जन्माला येतात तर कधी योगायोगातून निर्माण होतात. म्हणून अंधश्रद्धा आपण सर्वांनी नाकारली पाहिजे समाजातील अंधरुढी व वाईट परंपरा यांना नकार देण्याची क्षमता जागरूक लोकांनी समाजात निर्माण केली तर समाज सक्षम होईल असेही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक जोगदंड यांनी केले तर आभार गावचे पोलीस पाटील रामकिशन पांचाळ यांनी केले या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या